महाराष्ट्र

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी 1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

मुंबई: नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अनुषंगाने अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यासाठी आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले असून आयबीपीएस कडून दिनांक 22 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत. आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र/ हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आयबीपीएस कडून पाठविण्यात येणार आहेत.

या परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्था, मध्यस्थ अथवा इतरांकडून तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago