महाराष्ट्र

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मार्केट विभागात चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होणार

मुंबई: सिने जगतातील प्रतिष्ठेच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मार्केट विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्फत निवडण्यात आलेल्या चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये राज मोरे दिग्दर्शित खालीद का शिवाजी, जयंत सोमळकर दिग्दर्शित स्थळ, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित स्नो फ्लॉवर, महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या चित्रपटांचा समावेश आहे. या महोत्सवाकरिता शासनाच्या अधिकाऱ्यासह चित्रपटांच्या प्रतिनिधीचा चमू कानला रवाना झाला आहे.

दिनांक १५ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता पॅलेस सी याठिकाणी स्नो फ्लॉवर या चित्रपटाचे प्रदर्शन होईल तर दुपारी दीड वाजता पॅलेस बी येथे खालीद का शिवाजी, १८ मे २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता पॅलेस जी येथे जुन फर्निचर आणि दुपारी १.३० वाजता पॅलेस एफ येथे स्थळ या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.

मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि निर्मात्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळत असल्याची भावना चित्रपटांच्या निर्माते दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

5 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

6 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

8 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

9 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

10 तास ago