सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुलांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे बरेच जण उन्हाळी सहलीचा प्लॅन करतात. पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की ट्रिपला जाण्याचा आनंद खूप मोठा असतो. त्यासाठी जय्यत तयारीही केली जाते. पण गाडी लागण्याचा त्रास होत असल्याने ऐन प्रवासाचा दिवस जेव्हा येतो, तेव्हा आनंद व्हायचं सोडून टेन्शन यायला लागतं. कारण गाडीमध्ये बसताच उलट्या होतात की काय अशी भीती वाटायला लागते. बऱ्याच लहान मुलांना आणि महिलांना हा त्रास होतो. या त्रासामुळे मग प्रवासाचा मनमुराद आनंद घेता येत नाही आपल्या सहप्रवासींनाही याचा त्रास होतोच म्हणूनच प्रवासात उलट्या, मळमळ असा त्रास होऊ नये आणि छान आनंदाने सगळी सहल पार पडावी.
प्रवासात उलट्या, मळमळ असा त्रास होऊ नये म्हणून…
प्रवासात उलट्या, मळमळ असा त्रास होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील उपाय पुढीलप्रमाणे…
1) प्रवासादरम्यान मोबाईल पाहाणे, वृत्तपत्र वाचणे, एखादे पुस्तक वाचणे असे कटाक्षाने टाळा. कारण यामुळे मळमळ, उलट्यांचा त्रास वाढतो. गाडीमध्ये बसताच मोबाईलला तात्पुरते बाय बाय करून टाका.
२) खिडकीतून बाहेर पाहताना पळणाऱ्या वाहनांकडे पाहण्याऐवजी एखाद्या स्थिर गोष्टीवर नजर केंद्रित करा. उदाहरणार्थ आकाश, दूरवर दिसणारा एखादा डोंगर किंवा दूरवरचे एखादे मोठे झाड अशा गोष्टींकडे पाहा.
३) टेम्पो, ट्रक किंवा एसटी बसच्या मागच्या सीटवर बसून प्रवास करणे टाळा. कारण अशा प्रवासामुळे खूप धक्के लागतात आणि मळमळ, उलट्यांचा त्रास वाढतो.
४) प्रवासादरम्यान तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खाणं टाळा. त्याऐवजी लवंग, वेलची, बडिशेप, एखाद्या गोळ्या चघळत राहा.
५) प्रवास सुरू होण्यापुर्वी आलं आणि लिंबाचा काढा करून प्या. यामुळेही प्रवासातल्या उलट्या आणि मळमळीचा त्रास नियंत्रणात राहू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…