महाराष्ट्र

भोंदू अशोक खरातचा ‘डबल गेम’ उघड! आर्थिक गैरव्यवहारांसह शेतकरी फसवणुकीचाही संशय

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या Ashok Kharat या भोंदू बाबाच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. तपासादरम्यान त्याच्या आर्थिक व्यवहारांमध्येही मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय समोर येत आहे.

एसआयटीच्या (SIT) प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत. अनेक नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो बँक खाती उघडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये स्वतःला ‘नॉमिनी’ म्हणून नोंदवून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचा संशय आहे. या सर्व खात्यांना एकाच मोबाईल नंबरची लिंक असल्याचेही समोर आले असून, तो नंबर स्वतः खरात वापरत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर त्याचेच नियंत्रण असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

राजकीय कनेक्शनचा धागा

या प्रकरणात आता राजकीय संबंधांचाही कोन पुढे येत आहे. Rupali Chakankar यांच्या संपर्कातील एका व्यक्तीच्या नावानेही खाते उघडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बनावट कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक?

दरम्यान, अशोक खरातच्या गोरखधंद्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट ‘फार्मर प्रोड्यूसर कंपन्या’ स्थापन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. NAFED च्या खरेदी प्रक्रियेचा गैरफायदा घेत, कांदा आणि मका खरेदीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचा संशय आहे.‘व्यंकटेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी’मध्ये खरात आणि त्याची पत्नी संचालक असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय १५ ते १६ कंपन्यांमध्ये त्याची भागीदारी असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

तक्रार आणि पुढील कारवाई

या प्रकरणात Nilesh Shedge (स्वतंत्र भारत पक्ष) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, ईडीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.एकूणच, आधीच गंभीर असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहार आणि शेतकरी फसवणुकीचा नवा कोन समोर आल्याने तपास अधिकच गडद झाला आहे. येत्या काळात या प्रकरणातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

7 तास ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

8 तास ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

8 तास ago

मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल; आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात नागपूर: मुंबईत पुन्हा दहशतीचे…

8 तास ago

शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन महिन्यांत ६७ वाहने मालकांना परत

३७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तांतरित; वाहनमालकांना दिवाळीची भेट  शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): गुन्हे, अपघात तसेच…

9 तास ago

दात आणि तोंड यांची निगा कशी राखावी

दातांचे आजार आणि त्यांच्या उपायांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यत्वे दात किडणे (cavities) आणि हिरड्यांचे आजार (gum…

9 तास ago