महाराष्ट्र

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा; रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार

नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असून आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही कनेक्शन समोर आले आहे. तपासात त्यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने नाशिकमधील पतसंस्थांमध्ये खाते असल्याचे उघड झाले आहे.पोलीस तपासानुसार, संबंधित खात्यांमधून ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून तपास यंत्रणांनी चौकशी अधिक तीव्र केली आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी अशोक खरात याने नाशिकमधील दोन पतसंस्थांमध्ये शेकडो बेनामी खाती उघडल्याचे समोर आले आहे. लोकांचे आधार व पॅन कार्ड वापरून त्यांच्या नावाने खाती उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांवर खरातने स्वतःला ‘नॉमिनी’ म्हणून नोंदवले होते आणि बहुतेक खात्यांना एकाच मोबाईल क्रमांकाची लिंक असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.या खात्यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातून काळा पैसा पांढरा केल्याची शक्यता तपास यंत्रणा वर्तवत आहेत.

रुपाली चाकणकर यांनी याआधी अशोक खरातशी कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्या बहिणीच्या नावाने त्याच पतसंस्थांमध्ये खाते असल्याचे उघड झाल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास ‘एसआयटी’कडून सुरू असून संबंधित पतसंस्थांचे पदाधिकारी, चेअरमन आणि व्यवस्थापकांची कसून चौकशी केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाती उघडताना नियमांचे उल्लंघन झाले का, याचाही तपास केला जात आहे.या प्रकरणातील नव्या खुलाशांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

55 मिनिटे ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

4 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

6 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago