ashok-pawar-mauli-katake
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागात बुधवारी (ता. 1) झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे न्हावरेसह, कोहकडेवाडी, निर्वी, चिंचणी, गुनाट,निमोणे, शिंदोडी या गावात कांदा, ऊस, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब तसेच जनावरांची खाद्यपिके यांचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. गारपिटीचा सर्वात जास्त फटका गुनाट गावात बसला होता. त्यामुळे शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके तसेच माजी आमदार अशोक पवार या दोघांनीही शुक्रवार (ता. 3) रोजी गुनाट गावात पीडित शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
शुक्रवार (ता. 3) रोजी सकाळी 10 च्या सुमारास गुनाट-न्हावरे रस्त्यावरील गुणवंतवाडी येथील शेतकरी सुभाष बन्सी झराड यांच्या डाळिंब बागेची पाहणी केली. झराड यांच्या डाळिंब बागेचे गारपिटीमुळे अतोनात नुकसान झाले असुन हातातोंडाशी असलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला असुन त्यांचं अंदाजे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. दोन्ही आजी-माजी आमदारांनी सुभाष झराड यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. तसेच जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिले.
आमदार माऊली कटके यांच्यासह पंचायत समिती सदस्य दिपक कोहकडे, उद्योजक बबन वाळके यांनी न्हावरे, कोहकडेवाडी, निर्वी, गुनाट, निमोणे, शिंदोडी या ठिकाणी कार्यकर्त्यांसह भेटी देत नुकसानीची पाहणी केली. तर माजी आमदार अशोक पवार यांनीही गारपीट झालेल्या जवळपास सर्व गावात कार्यकर्त्यांसह भेट देत पाहणी केली. यावेळी गुनाट येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषानुसार हेक्टरी मिळणारी मदत तुटपुंजी असल्यामुळे आम्हाला हेक्टरी मदतीची रक्कम वाढवून द्यावी अशी मागणी केली.
आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार या दोघांनीही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या मागणीवर आपण शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी अशी विनंती केली. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, मंडल अधिकारी नंदकुमार खरात, तलाठी रुपेश शेटे, कृषी सहायक अंजुम मोमीन आणि शेतकरी उपस्थित होते.
साहेब सांगा आता जगायचं कस…?
गुनाट येथील गुणवंतवाडी येथील शेतकरी सुभाष झराड यांची पाऊणे दोन एकरात डाळिंबाची 700 झाडे आहेत. लागवडीपासुन पहिलं पिक हातात येईपर्यंत त्यांनी या बागेला 5 लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झराड यांची डाळिंबाची झाडे उन्मळून पडली. तसेच डाळिंबाला टिक पडली. त्यामुळे त्यांचं अंदाजे 10 लाख रुपयांच नुकसान झालं. त्यामुळे झराड दांपत्य हवालदिल झालं असुन साहेब आता तुम्हीच सांगा जगायचं कस…? असा प्रश्न त्यांनी पंचनामा करायला आलेल्या अधिकाऱ्यांना विचारला.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…