महाराष्ट्र

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एनजी आचार्य आणि डी.के. मराठे कॉलेज माजी विद्यार्थी संघटने’ चे सहकार्य 

मुंबई: ‘लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स’ आणि ‘सुमनालय फाउंडेशन’ च्या वतीने नुकतेच चेंबुर येथील ‘एनजी आचार्य आणि डी.के. मराठे कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटने’ च्या सहकार्याने आचार्य मराठे कॉलेजच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे नियोजन डॉ. प्रताप मुदलियार, डॉ. सुजाता वॉरियर, रुद्रन व्ही आणि प्रो.संतोष जाधव यांनी केले तर यासाठी माईमीडिया संस्थापक अध्यक्ष, सुमनालय फाऊंडेशनच्या सरचिटणीस,दै. द ग्लोबल टाईम्सच्या कार्यकारी संपादक शीतल हरीष करदेकर आणि एन जी आचार्य आणि डी.के मराठे काॅलेज चे व्यवस्थापन व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सीटीईएसचे कोषाध्यक्ष आणि कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख शैलेश आचार्य, प्राचार्य डाॅ सुनिल कदम आणि सीटीईएसचे विश्वस्त सदस्य हर्षवर्धन पांडे यांनीही शिबिरात सक्रिय सहभाग घेतला आणि आयोजकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी विद्यार्थी संघ प्रभारी आसिफ मेहंदीकर यांनी टीमसह पुर्ण सहकार्य केले.तसेच एमएआयचे अध्यक्ष आणि सुमनालय फाउंडेशनचे सचिव यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यहितासाठी अशा शिबिरांचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. न्यू एरा हॉस्पिटल, श्री रामकृष्ण नेत्रालय आणि हर्झॅप यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचा लाभ महाविद्यालयाच्या सुमारे १६० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

18 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

18 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

18 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago