मुख्य बातम्या

शिरुर पोलिसांनी वडगाव रासाई खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या १२ तासांत केली अटक

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथे दारु पाजण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर अवघ्या १२ तासांच्या आत शिरुर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११:३० वाजता वडगाव रासाई गावातील सृष्टी हॉटेलजवळील अंबिका पानटपरीसमोर अविनाश उर्फ विशाल जयवंत जावीर (वय ३०, रा. वडगाव रासाई) याचा खून झाला. दारु पाजण्यावरुन झालेल्या वादात आरोपी राहुल दत्ता गव्हांडे (वय २३, मूळ रा. उमरखेड, जि. यवतमाळ, सध्या रा. वडगाव रासाई) याने जावीर याला हाताने मारुन डोके दगडावर आपटुन त्याला ठार मारले.

या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व संतोष घोळवे यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तसेच हणमंत नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथके तयार करुन रवाना केली. या पथकाला तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज तपासणीदरम्यान आरोपीच्या हालचालीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार वडगाव रासाई येथील पाटीलमळा परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक झाल्यानंतर चौकशीत आरोपीने खून केल्याची कबुली दिली.

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हणमंत नकाते, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमाने, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, नाथसाहेब जगताप, अशोक शिंदे, संपत खबाले, अमोल गवळी, पोलीस अंमलदार नितेश थोरात, अजय पाटील, अमोल माने, किशोर वाघ, तानाजी बाबर, विजय शिंदे, सचिन भोई, निरज पिसाळ, पवन तायडे, रविंद्र आव्हाड, निखील रावडे यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

दारु पाजण्याच्या वादातून वडगाव रासाईत मित्राचा खून

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago