महाराष्ट्र

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! हडपसरवरून धावणार ८ नवीन रेल्वे, कधीपासून होणार सुरू

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हडपसर टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनला पर्यायी रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असलेले हडपसर टर्मिनलचे काम डिसेंबरअखेरपर्यंत होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा विकास सुरू होणार असल्यामुळे हरंगुळ एक्स्प्रेससह ८ रेल्वेगाड्या हडपसर टर्मिनल येथून सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे हडपसर येथून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या ११ होणार आहे. परिणामी पूर्व पुण्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी ही दोन स्थानके टर्मिनल म्हणून विकसित केली जात आहे. या दोन्ही टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू असून ही कामं डिसेंबरअखेरपर्यंत सुरू केली जाणार आहेत. हडपसर टर्मिनल येथे सध्या तीन फलाट आहेत. या ठिकाणाहून हैदराबाद एक्स्प्रेस, जोधपूर एक्स्प्रेस या दोन गाड्या सुरू आहेत. रिवा एक्स्प्रेस ही गाडी नव्याने सुरू करण्यात आली आहे. येथून डेमू सुरू आहेत. तसेच काही एक्स्प्रेसला हडपसर टर्मिनल येथे थांबा देण्यात आला आहे.
आता हडपसर टर्मिनल येथे दोन नवीन ‘स्टेबलिंग लाइन’ तयार झाल्या आहेत. त्या मुख्य मार्गासोबत जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी आवश्यक असलेली जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यामुळे हडपसर टर्मिनलचा विकास होत आला आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून विकासाची कामे वेगाने सुरू आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाचा विकास आणि रिमॉडेलिंगचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यावेळी पुणे रेल्वे स्थानक येथून एक्स्प्रेस गाड्या इतर ठिकाणी हलवाव्या लागणार आहेत. त्यापैकी काही गाड्या हडपसर टर्मिनल येथून सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये हरंगुळ एक्स्प्रेससह आठ गाड्या आहेत. पुणे-लातूर तेथून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हडपसर रेल्वे स्थानकाचा वापर वाढणार आहे.हडपसर टर्मिनलवरून एक्स्प्रेस गाड्या हळूहळू वाढवण्यात येत आहेत. सध्या जोधपूर, हैदराबाद, रिवा एक्स्प्रेस सुरू आहेत. येथून डेमू गाड्यादेखील सुटतात. या ठिकाणाहून सध्या ६ ते ७ हजार प्रवासी प्रवास करत आहेत.
हडपसर टर्मिनलसाठी खर्च किती
फलाटांची संख्या- ३
स्टेबलिंग लाइन- २
टर्मिनलसाठी खर्च- ९८ कोटी
सध्या सुटणाऱ्या एक्स्प्रेसची संख्या- ३
प्रवास करणारे प्रवासी- ६ ते ७ हजार
शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

22 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago