क्राईम

खराडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले अन्…

पुणे: पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल चालकाकडून कारवाईच्या धाकाने पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. खरं तर नियमानुसार हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी आहे. असे असताना देखील हे पोलिस उपनिरीक्षक रात्री सव्वा बारा वाजता हॉटेलमध्ये घुसून जेवण करत असलेल्या ग्राहकाचे व्हिडिओ चित्रीकरण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात बोलावून तुम्ही माझे काम केले तर मी तुमचे काम करतो असे म्हणत पैशाची मागणी करून रात्री साडेआठ वाजता ते स्वीकारतात.

दरम्यान यांबाबत खराडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी सांगितले की, आस्थापना बंद करण्याचे निर्धारीत वेळेचे नियम आहेत. हॉटेल रेस्टॉरंटला दिड वाजेपर्यंत परवानगी आहे. जे अधिकारी मिकाची क्लबमध्ये रात्री सव्वा बारा वाजता गेल्याचे समजते आहे. त्यांना आम्ही हॉटेल बंद करण्याबाबत सांगितले नव्हते. या प्रकाराची आम्ही माहिती घेतो.

तर दुसरीकडे पोलिस आयुक्तांनी हॉटेल संदर्भात काढलेली नियमावली आणि शहरातील आस्थापनांचा कालावधी याचा कदाचीत विसर पडला असावा. आयुक्त साहेबांनी काढलेली नियमावली सांगते, मनोरंजनासाठी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांना त्रास नको अपवादात्मक परिस्थिती सोडता, पोलिस सतत आस्थापनामध्ये प्रवेश करणार नाहीत. नियमभंग केल्याची कारवाई करायचे झाल्यास पोलिस मॅनेजरला बाहेर बोलावून घेतील. त्यानंंतर दीड वाजताची आस्थापना बंद करण्याची वेळ झाल्यानंतर करवाई करतील. त्याचबरोबर आस्थापनांना बंद करण्याचा कालावधी याचे स्पष्ट निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावलीत दिले आहेत.

फौजदारसाहेब हॉटेलमध्ये शिरून रात्री सव्वा बारा वाजताच हॉटेल बंद करण्यास सांगत असलेले आणि मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. तसेच त्यांनी दुसर्‍या दिवशी हॉटेल मॅनेजर आणि मालकाला देखील फोन केल्याचे समोर आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांकडून जर नियमांचे उल्लंघन होत असलेल तर त्यांच्यावर कारवाई होणे जरजेचेच आहे. परंतू केवळ कारवाई करण्याच्या धाकाने जर काही पोलिस अधिकारी आपले आर्थिक हेतू साध्य करून पाहत असतील तर हे नक्कीच पोलिसांच्या प्रतिमेला शोभणारे नसल्याचे बोलले जाते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

21 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago