महाराष्ट्र

आजोबांचं प्रेम, आजींची स्वप्नपूर्ती अन् मनाचा मोठेपणा; Video तुफान व्हायरल…

छत्रपती संभाजीनगर : पत्नीला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकले. संबंधित Video पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे. माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. सर्वांना मदत करावी आणि सर्वांबरोबर माणुसकीने वागावे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला माणुसकीचे दर्शन घडून येईल.

छत्रपती संभाजीनगरमधील गोपिका ज्वेलरी या दुकानातील हा व्हिडिओ आहे. प्रामाणिकपणा, प्रेम, भावनिकता, माणुसकी या सर्वांचं मिश्रण या व्हिडिओत पाहायला मिळते. व्हिडिओच्या सुरुवातीला ज्वेलर्सचे मालक आणि आजोबांमधील संवाद ऐकायला मिळतो. त्यात त्या दाम्पत्याला ज्वेलर्सने 93 वर्षांचे आजोबा आणि आजी कुठले असल्याचं विचारलं. यावर त्यांनी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील असल्याचं उत्तर दिलं. यासोबत एक जुनी घटना देखील या संवादात समजते. ज्यामध्ये दुसऱ्या एका दुकानातील विक्रेत्या महिलेचा गैरसमज झाला होता, असे ज्वेलर्सनं म्हटल्याचा संवाद या व्हिडिओत आहे.

एक ९३ वर्षीय आजोबा पत्नीला गळ्यातलं घेण्यासाठी शहरात आले, पण दुकानदाराने जे केलं त्याने मन जिंकलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सोनाराच्या दुकानात ९३ वर्षाचे आजोबा आणि त्यांचे पती आलेले आहेत. यावेळी या आजोबांना त्यांच्या बायकोसाठी माळ घ्यायची आहे असं ते म्हणत आहेत. यावर दुकानदार म्हणत आहे की, बाबा पैसे किती आणले ? तेव्हा हे आजोबा अकराशे रुपये आणि काही चिल्लर असल्याच दाखवतात. यावर या दुकानदाराने हे सर्व पैसे नाकारले आणि त्यांना दागीने असेच देऊ केले. यावर हे आजोबा तरीही पैसे घेण्यासाठी दुकानदाराला सांगताना दिसत आहेत. मात्र दुकानदार “पांडुरंगाचा आणि तुमचा आशिर्वाद सगळं कल्याणच कल्याण आहे.” असं म्हणत एकही रुपया घेत नाही. दुकानदाराच्या याच कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे.

आजोबांनी आजींसाठी माळ आणि वाटी घेतली असल्याचे सांगितले. आजींकडे 1100 रुपयांपेक्षा पेक्षा जास्त पैसे होते. आजोबांनी काही पैसे कापडात गुंडाळून आणले होते. ज्वेलर्सकडून पैसे न घेता दागिने देण्याचा प्रयत्न केला जात होता. तेव्हा आजोबा आणि आजी पैसे देण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर आजोबांनी आणि आजींनी ज्वेलर्सची विनंती मान्य करत काही तर रक्कम घ्यावी, असे म्हटले. यानंतर ज्वेलर्सनं 20 रुपये घेत ते जपून ठेवणार असल्याचे म्हटले. पांडुरंगाचे आणि तुमचे आशीर्वाद असल्यानं काय कमी पडतंय, असे ज्वेलर्सनं म्हटल्याचे व्हिडिओत ऐकायलं मिळते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दरम्यान, आजी आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर भावनिक होत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 93 वर्षांच्या आजोबांचं आजींवरील प्रेम, ज्वेलर्सनं दाखवलेला मनाचा मोठेपणा याबद्दल नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही जणांनी दागिन्यांची पुढील खरेदी या दुकानातून करणार असल्याचे म्हटले आहे.

Video; पुणे-नगर रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले अन फॉर्च्यूनर घुसली थेट गाळ्यात…

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

Video: हेल्मेटमध्ये लपलेला कोब्रा चावला दुचाकी चालकाला…

Video: विद्यार्थी एसटीमध्ये खिडकीतून चढायला गेला अन् पुढे पाहाच…

Video: हा माणूस जुगाडचा बाप ठरला….

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने…

2 मिनिटे ago

प्रारूप मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप; ‘नोटीस मिळणाऱ्या मतदारांची बूथनिहाय यादी जाहीर करा’

मुंबई: एसआयआर (Special Intensive Revision) मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या…

7 मिनिटे ago

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

19 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

23 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

1 दिवस ago