पुणे : ग्रामीण भागामध्ये नव्वदच्या दशकामध्ये वाहतूकीची मोठी समस्या होती. एसटी हे महत्त्वाचे साधन असल्याने त्यामध्ये चढण्यासाठी अनेकजण विविध पर्याय अवलंबवायचे. पण, आजही असाच प्रकार केला जात असल्याचे पाहायला मिळते. एका घटनेत एक विद्यार्थी खिडकीमधून आत शिरण्याच्या प्रयत्नात खिडकीसह पडला आहे. यामध्ये विद्यार्थी जखमी झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ग्रामीण वाहतुकीचा कणा ही एसटी बस मानली जाते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी एसटीने प्रवास करतात. एसटीत जागा मिळवणे जिकरीचं आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या उदयास आल्या. मित्राला सीट पकडायला सांगणे, खिडकीतून रूमाल टाकणे. असाच एका बस स्थानकावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाट पाहीन पण ‘एसटी’नेच जाईन!pic.twitter.com/HSpvStHfQY
— RJ हैरतंगेज (@saangkaamya) July 22, 2024
कॉलेज सुटलं आणि विद्यार्थ्यी घरी जाण्यासाठी बस स्थानकाकडे निघाली. थोड्याच वेळात बस फलाटवर लागली. गाडीत चढण्याची एकच धांदल उडाली. काहींनी रूमाल टाकले, तर काही कुठून जागा मिळते का? हे पाहत दरवाज्यात शिरण्याचा प्रयत्न करत होते. एका विद्यार्थ्याने मात्र अनोखा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला. खिडकीतूनच जाण्याचा निर्णय त्याने घेतला. पाठीवरील दप्तर खिडीकीतून सीटवर टाकलं. आणि थेट खिडकीतून चढण्याचा प्रयत्न सुरू केला. एक पाय खिडकीतून आत टाकला. आता दुसरा पाय आत टाकणार तोच खिडकीची चौकटच निघून त्याच्या हातात आली आणि तो थेट खाली कोसळला. विद्यार्थ्याला या घटनेत मुक्कामार लागला आहे. विद्यार्थ्याचा हा पराक्रम शेजारील एसटीमध्ये बसलेल्या युवकाने मोबाईलमध्ये कैद केला.
दरम्यान, संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. कोणी विद्यार्थ्याला दोष देत आहे तर कोणी सरकारवर तोंडसुख घेत आहे. बसवर जाहिरातबाजी करण्यापेक्षा त्या सुरक्षित करा, असा सल्लाही नेटीझन्स देत आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्याचं पुढे काय झालं? त्याचं नाव-गाव काय? याबद्दल माहिती मिळू शकली नाही. पण, हा व्हिडीओ बीड येथील असल्याची माहिती पुढे आली आहे.
थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…
Video: दारूचे व्यसन सोडवायला गेला अन् मिळाला खतरनाक ‘प्रसाद’…
Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…
Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…