महाराष्ट्र

शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार

मुंबई: शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी अधिक माहिती देताना मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. फहिम जहांगीर सय्यद यांना २५ लाख इतका घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यात आले होता. डॉक्टर सय्यद या सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने शासन नियमानुसार त्यांच्या घरबांधणी अग्रीमावरील व्याजाची रुपये ८ लाख ४९ हजार २३ रुपये इतकी रक्कम क्षमापित करण्यात मान्यता देण्यात आली. तसेच त्यांना मंजूर करण्यात आलेल्या आक्रम पैकी शिल्लक मुद्दल ९ लाख ६ हजार २५० रुपये त्यांना ते असलेल्या मृत्यु-नि-सेवा उत्पादनातून वसूल करण्यात आले. मात्र या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यांनी डॉ. सय्यद यांच्या मुद्दल व व्याजाची रक्कम असे १७ लाख ५५ हजार २७३ इतकी रक्कम त्यांच्या वारसा कडून धनादेशद्वारे मागणे हे नियमबाह्य आहे. याबाबत डॉ. सय्यद यांच्या वारसांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार, कॉलेज प्रशासनाने हे पैसे डॉ. सय्यद यांच्या वारसांना परत करणे आवश्यक आहे. डॉ. सय्यद यांच्या वारसा वसूल करण्यात आलेली रक्कम प्रकरणासंदर्भात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.

तसेच महाविद्यालयाच्या ताब्यात असणारी जागे संदर्भातही आपण स्वतः लक्ष घालून हा विषय मार्गी लावला जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री पाटील यांनी सांगितले. या संदर्भात सदस्य महेश शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

9 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

10 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago