मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणारे हे शिबिर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रशिक्षण शिबिरात काँग्रेसची आगामी काळातील दृष्टी व दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, पक्षाची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील काँग्रेसची भूमिका यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा, मुद्दे आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही संवादामध्ये विशेष महत्त्व दिले जाणार आहे.
राज्य आणि देशपातळीवरील विविध क्षेत्रांतील मान्यवर अभ्यासक व तज्ज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय वॉर रूमचे अध्यक्ष खासदार शशिकांत सेंथिल तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतेही प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत. सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील AICC प्रशिक्षण टीम संपूर्ण प्रशिक्षणाची धुरा सांभाळणार आहे.
‘नवी पिढी, नवे नेतृत्व आणि मजबूत संघटन’ या व्यापक दृष्टिकोनातून प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करताना जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, संघटनात्मक कौशल्य, वैचारिक स्पष्टता आणि नेतृत्वक्षमता या चारही बाबी विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रशिक्षणार्थी दररोज श्रमदानात सहभागी होणार असून, ग्रामीण भागातील वास्तव समजून घेण्यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभवही त्यांना दिला जाणार आहे. श्रम, संघर्ष, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर प्रशिक्षणात विशेष भर असेल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली.
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…