महाराष्ट्र

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील’; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ!

जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून नेत्यांच्या वक्तव्यांतून अंतर्गत मतभेद आणि अविश्वास समोर येत असतो. आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “मी भोळा राहिलो तर मला भाजपवाले खाऊन जातील,” असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री जे. टी. महाजन यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुलाबराव पाटील यांनी जे. टी. महाजन यांच्या कार्याचा गौरव करताना सहकार क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला. जिल्हा दूध संघाची धुरा आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे असल्याचा संदर्भ देत त्यांनी दूध संघ चांगला चालवण्याचा सल्ला दिला. “कार्यक्रम केला तर कार्यक्रम होईल,” असा टोला त्यांनी मंगेश चव्हाण यांना लगावला.

सहकार क्षेत्रातील साखर कारखाने अडचणीत येत असल्याबद्दलही पाटील यांनी भाष्य केले. सहकारी साखर कारखाने बंद पडतात, मात्र खासगी कारखाने सुरू राहतात, असे सांगत त्यांनी मंगेश चव्हाण यांच्या खासगी साखर कारखान्याचाही उल्लेख केला.

दरम्यान, दूध संघात तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी आल्याने दूध संकलन वाढल्याचे सांगत गुलाबराव पाटील यांनी मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले. दूध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उपलब्धतेत झालेल्या वाढीचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खातील’

गुलाबराव पाटील यांच्या भाषणातील सर्वाधिक चर्चेत आलेले विधान म्हणजे “मी भोळा राहिलो तर मला भाजपवाले खाऊन जातील.” त्यांच्या या वक्तव्याने महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील संबंधांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

याचवेळी आपल्या वक्तव्यांबाबतही त्यांनी मिश्कील भाष्य केले. “माझ्या तोंडातून काहीही निघतं आणि बोललं जातं. मग टीव्हीवाले काहीही दाखवतात. त्यामुळे आता मी सांभाळून बोलतो,” असे ते म्हणाले. मात्र, त्याआधीच त्यांनी भाजपबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

याशिवाय जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना उद्देशून “बँकेकडे लक्ष ठेवा, नाहीतर बँक उचकून जाईल,” असा खोचक सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही निवडणुकांपासून भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक राजकीय स्पर्धा अनेकदा उघडपणे दिसून आली आहे. त्यातच आता गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

17 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

18 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

23 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago