महाराष्ट्र

वाहतूकदारांच्या प्रश्न बाबत शासन सकारात्मक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वाहतूकदार संघटनांना संप मागे घेण्याचे आवाहन

मुंबई: वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इतर विविध वाहतूक संघटनांना देखील स्वतंत्रपणे चर्चेसाठी वेळ देता येईल. उपोषण व संप करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. विधानमंडळ समिती कक्षामध्ये परिवहनमंत्री श्री. सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह( शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, उपस्थित होते.

परिवहन मंत्री श्री सरनाईक म्हणाले, वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये टँकर वाहतूकदार व इतर वाहतूकदारांचे प्रतिनिधी देखील घेण्यात येतील. व्यापार वाढल्याने विकासास फायदा राज्य शासनाला देखील होतो . व्यापार -उद्दीम वाढण्यामध्ये वाहतूकदारांचा मोलाचा वाटा असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाहतूकदारांच्या बाजूने निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. वाहतूकदारांचा विकासात सहभाग महत्वाचा असल्याने त्यांना संरक्षण देणे हे शासनाचे काम आहे.

परिवहन मंत्र्यांनी शहरांमध्ये पार्किंग जागा निर्माण करणे, विशेषतः मुंबई शहरातील खाजगी प्रवासी बसेस, स्कूल व्हॅन, माल ट्रक, टँकर आधी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होईल. परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना यावेळी दिल्या आहेत.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले मुंबई शहरात खाजगी प्रवासी बस व स्कूल बस यांच्या पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जात आहे. बेस्ट बसेसच्या पार्किंगच्या जागा, हजारोंच्या संख्येने असलेल्या बसेस साठी जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे. नगर विकास पोलीस व परिवहन विभागाच्या वतीने एकत्रित बैठक घेण्यात येईल. इ चलानबाबत तक्रारीची दखल घेऊन यावेळी पोलीस विभागास सूचना दिली.

मुख्य सचिव श्री चव्हाण व परिवहन आयुक्त श्री भिमनवार यांनी यावेळी माहिती सादर केली. वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी संप मागे घेण्याबाबतच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी बैठकीसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, मुंबई बस मालक संघटना, फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर, स्कूलबस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ट्रक लोरी ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्र हेवी वेहिकल इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन, वाहतूकदार बचाव कृती समिती या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी 

मा. मंत्री परिवहन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

7 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

7 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

7 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

7 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

7 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

7 तास ago