महाराष्ट्र

उद्धवस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत

शेतकरी कर्जमाफी कधी देणार, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल

नागपूर: महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर मध्ये ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या १५ दिवसात ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना आज फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगत ही तर सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात शेतकऱ्यांची जमीन खरवडून निघाली आहे. त्यांची जनावर वाहून गेली आहेत अशा वेळी शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत करण्याची अपेक्षा होती. अस असताना NDRF निकषानुसार दिलेली मदत ही तुटपुंजी आहे. याने शेतकरी उभा राहणार नाही तर उद्धवस्त होईल अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.पंजाबसारखे राज्य केंद्राची मदत न घेता प्रति हेक्टरी ५० हजार पर्यंत मदत देऊ शकते मग महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यात शेतकऱ्यांना ठोस मदत का दिली जात नाही? सरकारने जाहीर केलेली मदत दिवाळीच्या आधी मिळणार आहे का?शेतकऱ्यांबरोबर शेतमजूर देखील अडचणीत आला आहे, त्यांना काय मदत मिळणार, असा प्रश्न वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती.आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असताना त्याची घोषणा केली नाही. कर्जमाफी करणार करणार फक्त तारीख पे तारीख सरकार सांगत आहे पण नेमकी शेतकरी कर्जमाफी कधी देणार हे सरकार सांगत नाही अशी टीका विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे काहीही कारण नसताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. सर्व समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून जातीनिहाय जनगणना करावी, तसेच आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा हटवावी ही भूमिका देशात सर्वात आधी राहुल गांधी यांनी मांडली आहे. अस असताना जरांगे पाटील त्यांना का टार्गेट करत आहे? जरांगे पाटील यांची लढाई सामान्य जनतेसाठी आहे की विरोधकांच्या विरोधात आहे? गेल्या काही दिवसातील जरांगे पाटील यांच्या विधानामुळे त्यांचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी नागपूर इथे माध्यमांशी बोलताना केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

59 मिनिटे ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago