महाराष्ट्र

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक

मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज चौंडी येथे व्यक्त केल्या.

अखंड भारताच्या कल्याणाचा ध्यास घेणाऱ्या, न्याय, त्याग आणि कर्तृत्वाचे प्रतीक असणाऱ्या, पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी आज सुनेत्रा अजित पवार या नतमस्तक झाल्या. पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या उपस्थित राहिल्या.

अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांनी आदर्श न्यायदानाची व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. घाट, मंदिरे बांधताना, दानपुण्य करताना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या असेही सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या स्वतः चौंडीला आल्या होत्या. राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करण्याचा योग आला त्याबद्दल सुनेत्रा अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त ‘गोदावरी ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रे’चा भव्य शुभारंभही नुकताच करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ असे नाव देण्यात आले आहे. आदरणीय अजितदादांच्या प्रयत्नाने बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झाले आहे. या महाविद्यालय आणि रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. चौंडी येथील विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago