महाराष्ट्र

पुण्यात त्या हॉस्पिटलमध्ये पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू

पुणे: डेक्‍कन येथील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पतीचा व त्‍यांना यकृत देणाऱ्या पत्‍नीचा सहा दिवसांनी मृत्यू झाला. नातेवाइकांनी रुग्णालयाकडून शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला आहे.तर, वैद्यकीय नियमांनुसार शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रत्‍यारोपणानंतर पतीला हृदयविकाराचा झटका (कार्डिओजेनिक शॉक) आल्‍याने व पत्‍नीचा अचानक रक्तदाब खूप कमी झाला (हायपोटेन्सिव्ह शॉक) ने मृत्‍यू झाल्‍याचे रुग्‍णालयाच्‍या वतीने सांगण्‍यात आले.यामध्ये बापू बाळकृष्ण कोमकर (वय-४८) आणि त्‍यांची पत्‍नी कामिनी कोमकर (वय-४२, दोघेही रा. हडपसर) असे शस्त्रक्रियेनंतर मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दांपत्‍याचे नाव आहे.

बाळकृष्‍ण कोमकर यांना शेवटच्या टप्प्यातील यकृताचा आजार म्‍हणजे ‘लिव्‍हर सिरॉसिस हा होता. त्‍यांना यकृत प्रत्‍यारोपण करणे हाच शेवटचा पर्याय असल्‍याने पत्‍नी कामिनी यांनी त्‍यांचे अर्धे यकृत दान करण्‍याची तयारी दाखवली.अशा प्रकारच्‍या शस्‍त्रकि्रयांमध्‍ये दात्‍याचे अर्धे यकृत काढून ते रुग्‍णावर प्रत्‍यारोपित केले जाते. मग काही दिवसांनी ते दोघांच्‍याही यकृताची वाढ होत असते. त्‍यांना डेक्‍कन सह्याद्री रुग्‍णालयात दाखल केले. व १५ ऑगस्‍ट रोजी पत्‍नीच्‍या यकृताचा तुकडा काढून तो बाळकृष्‍ण यांच्‍यावर प्रत्‍यारोपित केला. मात्र काही तासांतच बाळकृष्‍ण यांचा मृत्‍यू झाला.

कामिनी यांना कोणताही आजार नव्‍हता. त्‍यांच्‍यावरही रुग्‍णालयात उपचार सूरू होते. परंतु, त्‍यांचादेखील उपचारादरम्‍यान सहाव्‍या दिवशी मृत्‍यू झाला. याबाबत कामिनी यांचे भाऊ बलराज वाडेकर म्हणाले, “माझ्या बहिणीला मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखा कोणताही आजार नव्हता. शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांनी तिला धोका फक्त ५ टक्के असल्याचे सांगितले होते.

रुग्‍णालयाच्‍या निष्‍काळजीपणामुळे तिचा मृत्‍यू झाला आहे. माझा मेहुणा यांची प्रत्‍यारोपण शस्त्रक्रिया झाली आणि काही तासांतच मृत्यू झाला. याप्रकरणी आम्‍ही रुग्‍णालयाविरोधात पोलिस ठाण्‍यात तक्रार देखील करणार आहेत.’ बापू कोमकर हे खासगी कारखान्यात कामाला होते तर कामिनी या गृहिणी होत्‍या. शस्त्रक्रियेच्‍या खर्चासाठी त्‍यांनी घरही गहाण ठेवले होते.

रुग्णालयाने प्रसिद्धीस दिलेल्‍या निवेदनात म्हटले आहे की आम्ही कुटुंबीयांसोबत मनःपूर्वक सहानुभूती व्यक्त करतो. यकृत प्राप्तकर्ता रुग्ण यकृत विकारासह उच्च जोखमीचा होता. नियमानुसार कुटुंबीयांना जोखीम आधीच सांगण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार करण्यात आली आहे.

दुर्दैवाने, प्रत्यारोपणानंतर अवयव प्राप्तकर्त्याला कार्डिओजेनिक शॉक आला आणि सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. दात्‍या महिलेची प्रकृती सुरवातीला चांगली होती, परंतु सहाव्या दिवशी तिला अचानक रक्तदाब कमी होऊन (हायपोटेन्सिव्ह शॉक) अनेक अवयव निकामी होऊ लागले व तिचा मृत्‍यू झाला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

4 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago