महाराष्ट्र

मी सोबत नांगराचा फाळ आणला आहे, माझ्या नादाला लागला तर…

सांगोला: सांगोला येथे जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. ते बोलताना म्हणाले, माझ्या नादाला लागून आजवर अनेक जण भेंडाळले आता तुम्ही आलात काय? अस बोलत महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट इशारा दिला आहे. मात्र बोलण्याच्या ओघात सदाभाऊ खोत यांच्याकडून अपशब्द वापरण्यात आले.

आजवर शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाईची विक्री केली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे. असे असताना काही लोकं गाया अडवतात मी त्याला विरोध केला तर मला धमकीचे फोन येऊ लागले आहेत, मात्र माझ्या नादाला लागू नका मी सोबत नांगराचा फाळ आणलेला आहे, तो नांगराचा फाळ तुमच्या xxxमध्ये घालीन, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाई बाजारामध्ये विकायला आणलेली नाही, हा हजारो वर्षांचा अतिहास आहे. मी तुम्हाला विचारतो कधी आपण देशी गाई बाजारात घेऊन आलो का? कधी खिलार गाय बाजारात आणली का? खिलार किंवा देशी गाईची कधीच विक्री होत नाही. लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला लागलो, मला धमक्या यायला सुरू झाल्या. अरे धमक्या कोणाला देता, शेतकऱ्यांच्या पोराला म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय, तुम्ही जर माझ्या वाटेला गेला. तर तुमच्या xxx नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सांगोल्यामध्ये जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात सदाभाऊ खोत यांचे नेतृत्वाखाली सांगोल्यात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सदाभाऊ खोत त्यांच्या शैलीत बोलले, मात्र हे बोलत असताना त्यांची जीभ घसरली.

गोरक्षक हेच मोठे दलाल झालेले आहेत. शेतकऱ्यांना अडवून गाई आणि जर्शी गाई गोशाळेत पाठवून दिल्या जातात. परंतु, गोशाळेत किती गाई आणि म्हशी गेल्या आहेत? त्यांची पुढे विल्हेवाट काय लावण्यात आली? त्या गाई किंवा म्हशी जिवंत आहेत का? म्हशी किंवा गाईंचा टेम्पो भरला की गोरक्षकवाले पुढील कार्यकर्त्याला फोन लावलात, तो पुढे फोन लावतो, एकजण पुन्हा पोलीस स्टेशनला फोन करतो आणि सगळी मिळून टेम्पोवाल्याच्या मागे लागतात. तुम्हाला कामे धंदे आहेत की नाही? तुम्ही दहा वीस गाई पाळा, शेण काढा, व्यवसाय करा, बोक्यांनो…शेतकऱ्यांच्या जीवावर कुठे जगत आहात, अस बुधवारी नाशिक येथे सदाभाऊ खोत म्हणाले होते. यानंतर काल (गुरुवार) सांगोला येथे बोलताना त्यांची जीभ घसरल्याने नवीन वाद होण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

1 दिवस ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

3 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago