महाराष्ट्र

मुंबईसारख्या शहरात मुलींवर अत्याचार होत असेल तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल

मुंबई: मुंबईच्या चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वसतीगृहात एका मुलीवर अतिप्रसंग झाला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात घडत असेल म्हणजे जिथे पोलिसांची सतत गस्त असते तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण, सुरैना मल्होत्रा, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर आदी उपस्थित होते.

या निवेदनात अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. शिवाय महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या शक्ती कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा आणि त्याबाबत जनजागृती व्हावी, अशी मागणी करण्यात आल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

डिसेंबर २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा बहुमताने विधीमंडळात आणला आणि या कायद्याला विरोधी पक्षाने पाठिंबा दिला होता. हा कायदा मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. मात्र जून २०२३ उजाडले तरी या शक्ती कायद्याला केंद्रसरकारची मान्यता मिळाली नाही. जर या कायद्याला मान्यता मिळाली असती तर अत्याचाराच्या घटनेला चाप बसला असता असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.

आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर हा शक्ती कायदा आणण्यात आला. मात्र या महत्त्वपूर्ण कायद्याला मंजुरी का देण्यात आली नाही याचे उत्तर केंद्रीय गृहविभागाने जनतेला द्यायला हवे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्रसरकारने खो का घातला आहे, असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

16 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago