संभाजीनगर: जर तुमच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर घाबरून न जाता किंवा लाच न देता तुम्ही थेट एसीबीकडे तक्रार करू शकता. एसीबी तुम्हाला पूर्ण सहकार्य करते आणि तुमची ओळख गुप्त ठेवते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार कशी करावी
टोल-फ्री क्रमांक
1064 – २४x७ उपलब्ध. कॉल करून तक्रार सविस्तर सांगा.
व्हॉट्सअँप क्रमांक
9930997700 – या क्रमांकावर मेसेज पाठवून तक्रार करा.
ऑडिओ/व्हिडिओ क्लिप्ससारखे पुरावे सुद्धा पाठवू शकता.
मोबाईल ॲप्लिकेशन
ACB Maharashtra – हे ॲप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे.यामध्ये तक्रार फॉर्म, पुरावे अपलोड सुविधा, आणि कार्यालयाची माहिती उपलब्ध आहे.
प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन
जवळच्या ACB कार्यालयात जाऊन लेखी तक्रार द्या. अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करतील.
ई-मेलद्वारे तक्रार
तुमच्या जिल्ह्याच्या ACB युनिटच्या अधिकृत ई-मेलवर तक्रार सविस्तर लिहून पाठवा. (संपूर्ण यादी खाली वेबसाईटवर दिली आहे.)
अधिकृत वेबसाईट
https://www.acbmaharashtra.gom.in
छ. संभाजीनगर (औरंगाबाद) ACB संपर्क क्रमांक; 0240-2344050
तक्रार करताना ही माहिती द्यावी
नाव व संपर्क क्रमांक (गोपनीय ठेवले जाते)
अधिकाऱ्याचे नाव, पद व विभाग
कामाचे स्वरूप व लाच मागितलेली रक्कम
तारीख, वेळ व ठिकाण
पुरावे (ऑडिओ, व्हिडिओ, दस्तऐवज) – असल्यास जोडावे.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…