महाराष्ट्र

एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला

मुंबई: महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत सर्व्हेमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे – ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते, नाहीतर भाजपने महापालिकेत कब्जा केल्याचं समजाव.

सर्व्हेतील महत्वाचे निष्कर्ष

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती झाली तर 100+ जागा सहज मिळू शकतील, असा या सर्व्हेचा अंदाज आहे.तर मनसेला स्वतंत्रपणे लढल्यास 25 जागा मिळण्याची शक्यता, परंतु युतीत मनसेला अधिक फायदा होणार.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्व्हेवरून तयार केलेल्या आकडेवारीनुसार, दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजप, शिंदे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित पूर्णपणे कोलमडू शकते.

याआधी काय घडलं होतं

2012 मध्ये एकसंध शिवसेनेला 75, भाजपला 31 जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये शिवसेना व भाजप वेगळे लढले, तेव्हा शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या. मनसे केवळ सात जागांवर सीमित राहिली होती.

मराठी मते आणि ठाकरे ब्रँडची ताकद

गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहीम, वांद्रे, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग या मराठी बहुल भागात ठाकरे बंधू एकत्र आले तर मोठा फरक पडणार आहे. युती न झाल्यास राज ठाकरे यांच्या मनसेला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागेल, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे.

भाजपची रणनीती स्पष्ट

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक गळाला लावले आहेत. यामुळे भाजप-शिंदे युतीने महापालिका ताब्यात घेण्याचा विश्वास बाळगला आहे.

राजकीय भविष्य

सर्व्हेचा निष्कर्ष स्पष्ट सांगतो; “ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका पुन्हा त्यांच्याच ताब्यात येईल. पण जर ते वेगळे राहिले तर भाजपचा दणका अटळ आहे.” त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

4 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

4 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

10 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

10 तास ago