महाराष्ट्र

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध

मुंबई : नीट (NEET) पेपर लीक प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या कठोर उपाययोजनांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत त्यांनी या निर्णयाला महाराष्ट्राचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पेपर लीकसारख्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असलेले विधेयक संसदेत आणण्याची तयारी सुरू आहे.

शिंदे यांनी सांगितले की, जंतर-मंतरसह देशभरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केंद्र सरकार सातत्याने संवाद साधत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचीही केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी भेट घेऊन चर्चा केली, त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांचे अधिकार, त्यांचे भवितव्य आणि गुणवत्तापूर्ण परीक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारसोबत समन्वयाने काम करण्यास पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

7 तास ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

7 तास ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

8 तास ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

8 तास ago

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

14 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

15 तास ago