महाराष्ट्र

तुमच्या शरीरावर ‘टॅटू’ असल्यास नाही मिळणार ‘या’ सरकारी नोकऱ्या…

जर तुम्ही टॅटू लव्हर असाल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगत असाल, तर टॅटू काढण्यापूर्वी नियम समजून घ्या. भारतातील काही प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अपात्र मानले जाते.

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

भारतीय महसूल सेवा (IRS)

भारतीय पोलीस सेवा (IPS)

भारतीय परराष्ट्र सेवा (IFS)

भारतीय हवाई दल (Indian Air Force)

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)

इंडियन आर्मी (Indian Army)

भारतीय नौदल (Indian Navy)

राज्य पोलीस सेवा

का नाही मिळत टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरी

आरोग्याचे प्रश्न

टॅटूमुळे त्वचारोग, संसर्ग आणि रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते, विशेषतः जर टॅटू बनवताना योग्य स्वच्छता पाळली गेली नसेल तर.

व्यावसायिक प्रतिमा

टॅटू असलेल्या उमेदवारांकडे अनेकदा हलक्या गंभीरतेने पाहिले जाते. त्यांना त्यांच्या छंदांना अधिक महत्त्व दिले जाते, जे व्यावसायिक जबाबदारींसाठी प्रतिकूल मानले जाते.

सुरक्षेच्या दृष्टीने जोखीम

सुरक्षा दलात नोकरी करताना टॅटू असलेली व्यक्ती सहज ओळखता येते. पकडले गेल्यास टॅटूमुळे ओळख पटण्याचा धोका वाढतो, जे सुरक्षेसाठी गंभीर समस्या निर्माण करते.

फिजिकल स्टँडर्डसचा भाग

विशेषतः लष्करी व पोलीस सेवांमध्ये शारीरिक स्वरूपावर विशेष लक्ष दिले जाते. शारीरिक कसोटीच्या मानकांमध्ये टॅटूबाबत स्पष्ट अटी आहेत.

काही सवलती उपलब्ध आहेत का

प्रादेशिक परंपरा व धार्मिक कारणांसाठी टॅटू

काही ठिकाणी पारंपरिक, धार्मिक किंवा आदिवासी लोकांच्या प्रथेनुसार टॅटू काढले जातात. अशा प्रकरणांमध्ये, उमेदवारांना तपशीलवार स्पष्टीकरण द्यावे लागते आणि नियमांनुसार त्यावर निर्णय घेतला जातो.

छोटे व अदृश्य टॅटू

जर टॅटू लहान असेल, वर्दीत दिसणार नसेल किंवा त्याचा कामावर परिणाम होणार नसेल, तर काही वेळा सवलत मिळू शकते.

टॅटूबाबत नियम कसे तपासायचे

प्रत्येक नोकरीसाठी अधिसूचनेतील (Notification) मार्गदर्शक तत्त्वे नीट वाचा.

विशेषतः लष्करी, पोलीस आणि हवाई दलातील भरती प्रक्रियेत टॅटूबाबत कठोर नियम पाळले जातात.

जर तुमच्या शरीरावर टॅटू असेल, तर काय कराल

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करत असाल आणि तुमच्याकडे टॅटू असेल, तर त्याच्या remove केल्याचे प्रमाणपत्र घेऊन अर्ज करणे योग्य ठरेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

5 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

5 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

5 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

5 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

5 तास ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

5 तास ago