महाराष्ट्र

संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

नागपूर: संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्वाचे असते. विविध पक्ष आपल्या विचारधारेप्रमाणे लोककल्याणाचे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. सामान्य नागरीकांचे प्रश्न, समस्या, त्यांचे दु:ख मांडण्याचे काम पक्षीय संघटना करते. लोकशाहीत पक्षीय संघटना आणि पक्षातील अंतर्गत लोकशाही देखील तितकीच महत्वाची ठरते, असे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

विधानभवन येथे 51 व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व, योगदान व जबाबदारी आणि लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करतांना श्री.पाटील बोलत होते. यावेळी विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर, विधानभवनचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते. सुरुवातीस श्रीमती तळेकर यांनी मंत्री श्री.पाटील यांचे स्वागत केले.

संसदीय लोकशाहीत सर्वात खालच्या पातळीवरची आणि गावांचा कारभार पाहणारी संस्था म्हणून ग्रामपंचायत काम करते. केवळ या संस्थेच्या निवडणूका पक्ष विरहीत असतात. त्यानंतर सर्व संस्थांच्या निवडणूका विविध पक्षांच्यावतीने लढविल्या जातात. निवडणूका लढतांना पक्षांच्यावतीने आपआपली विचारधारा लोकांपुढे ठेवली जाते. पक्ष संघटनेद्वारे आपले पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामार्फत अधिकाधिक नागरिकांपर्यत विचारधारा पोहोचवून त्याद्वारे नागरिकांचे सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न होत असतो, असे पुढे बोलतांनी मंत्री श्री.पाटील म्हणाले.

प्रत्येक पक्षाची विचारधारा, व्हिजन वेगवेगळे असू शकते. त्या विचारधारेवर आधारीत कार्यकर्ते तयार होत असतात. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. आमच्या पक्ष संघटनेत प्रत्येक घराचे देखील नियोजन केले जाते. पक्ष संघटना वाढविण्यासाठी असे नियोजन फार महत्वाचे ठरतात.

भारतीय राज्यघटनेने आपल्याला लोकशाही दिली. देशात लोकशाही पद्धतीने राज्य चालते. अशी लोकशाही पक्ष संघटनेत देखील असणे आवश्यक आहे. कोणतीही एक व्यक्ती अनेक काळ पक्ष पदाधिकारी असू नये, दर तीन वर्षांनी पक्ष संघटनेत बदल व्हावे, असे बदल पक्षीय लोकशाहीला बळकट करतात. पक्षीय लोकशाहीत मजबूत विचारधारा पक्षाला मजबूत करत असते, असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

56 मिनिटे ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

8 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago