महाराष्ट्र

बारामती परिमंडलात ५१ टक्के वीजग्राहक ऑनलाईन तर ४९ टक्के अजूनही रांगेतच

बारामती: चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यात भारताचे चांद्रयान-३ लवकरच यशस्वी होईल. डिजीटल इंडियासाठी हा गौरवाचा क्षण असेल. पण याच डिजीटल इंडियात व महाराष्ट्रात तब्बल ४९ टक्के वीजग्राहक आजही पारंपरिक पद्धतीने स्वत:चा वेळ व पैसा वाया घालत रांगेत उभे राहून वीजबिल भरत असल्याचे वास्तव आहे.

बारामती परिमंडलात शेतीचे ग्राहक वगळता २० लाख ३४ हजार ग्राहक आहेत. ज्यापैकी १२ लाख ८४ हजार ग्राहकांनी जून महिन्यात वीजबिल भरले. त्यातील ६ लाख ५६ हजार २४४ (५१ टक्के) ग्राहकांनी विविध ऑनलाईन पर्यायाद्वारे घरबसल्या वीजबिल भरले व ऑनलाईन सूट व पेट्रोलचे पैसे वाचविले. तर ६ लाख २९ हजार ६५५ ग्राहकांनी उन्हातान्हात घराबाहेर पडून, स्वत:चा वेळ व पेट्रोलचा खर्च करुन वीजबिल भरले. त्यातील कुणी वीजबिल भरण्यासाठी स्वत:च्या कामावर उशिरा पोहोचते तर कुणाला अर्धा दिवसाची रजा टाकावी लागते. यातून दुहेरी नुकसानच होते.

आज सर्व शहरात, गावांत 4G नेटवर्क पोहोचले आहे. स्मार्टफोन सुद्धा खिशात आहेत. मात्र त्याचा वापर फक्त सेल्फी पुरता न करता दैनंदिन कामे सुकर करण्यासाठी केला तर महावितरणचे वीजबिल वेळेआधी व घरबसल्या भरणे सहज शक्य आहे.

ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठीचे पर्याय 

1) संकेतस्थळ www.mahadiscom.in नावाने महावितरणचे संकेतस्थळ असून, या संकेतस्थळावर वीजबिल भरण्याची जलद सुविधा उजव्या कोपऱ्यात दिली आहे. १२ अंकी वीजग्राहक क्रमांक टाकून वीजबिल सहज भरता येते. गुगलवर view & pay bill सर्च केल्यास पैसे भरण्यासाठी wss सुविधा वापरता येते. सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांच्या नेटबँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर वीजबिल भरण्यासाठी करता येतो.

2) मोबाईल ॲप:- प्ले स्टोअर व ॲप स्टोअरवर महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे. हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन आपण एकापेक्षा जास्त वीजजोडण्या जगाच्या पाठीवर कोठूनही हाताळू शकतो. यात वीजबिल पाहण्याची, भरण्याची, वीजपुरवठा व वीजबिलासंबंधी तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. नावात बदल, वीजभार कमी जास्त करण्याची मागणी सुद्धा यातून नोंदवता येते. लाखो ग्राहकांनी हे ॲप लाऊनलोड केले आहे.

3) UPI Gateways:- BHIM, Gpay, PhonePay, Paytm यांसारखे UPI ॲप आपल्या बँक खात्याशी संलग्न करुन वीजबिल सुलभरित्या भरता येते. एकदा यावर वीजबिल भरले तर पुढचे वीजबिल तयार होताच हे ॲप आपल्याला ते भरण्याची सुचना देतात.

4) QR कोड:- गेल्या काही वर्षांपासून वीजबिलावर क्यूआर कोड (Quick Response code) छापला जात आहे. बिलावरील क्यूआर कोडला युपीआय ॲपद्वारा स्कॅन केले की वीजबिल भरता येते. येथे वीजबिलाची रक्कम टाकण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे…

ऑनलाईन वीजबिल भरण्याचे अनेक फायदे आहेत. इथे वेळेसोबत इंधनाची बचत होते. वरील पर्यायाद्वारे एका क्लिकवर बील भरता येते. वीजबिल तयार झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत वीजबिल भरले तर जवळपास १ टक्का सूट मिळते. याशिवाय ऑनलाईन भरल्यामुळे अतिरिक्त पाव टक्का असे मिळून सव्वा टक्क्यांची बचत करता येते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

17 मिनिटे ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

20 मिनिटे ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

2 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

2 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago