महाराष्ट्र

लोकल प्रवासात ‘परफ्युम’ ठरतोय सापळा! ठाणे स्टेशनवरील तरुणीचा धक्कादायक अनुभव व्हायरल

परफ्युम विक्रीच्या बहाण्याने दागिने व मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या टोळीपासून सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईत लोकल ट्रेन आणि स्टेशन परिसरात प्रवास करताना फिरते विक्रेते परफ्युम, कपडे, घरगुती साहित्य विकताना सर्रास दिसतात. अनेकदा मदतीच्या भावनेतून प्रवासी अशा विक्रेत्यांशी संवाद साधतात किंवा वस्तू खरेदी करतात. मात्र, हाच दयाळूपणा कधी कधी धोकादायक ठरू शकतो.

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तिने ठाणे स्टेशन परिसरात स्वतःसोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. इंस्टाग्रामवर आकांक्षा परब या तरुणीने शेअर केलेल्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

आकांक्षा परब हिने सांगितले की, ती ठाणे स्टेशनजवळील गोल्डन सिनेमा लेनमध्ये खरेदी करत असताना एका परफ्युम विक्रेत्याने तिच्याकडे परफ्युम खरेदी करण्याचा आग्रह धरला. तिने स्पष्ट नकार दिल्यानंतरही तो विक्रेता तिथेच घुटमळत होता. काही वेळाने ती कपड्याच्या दुकानातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तोच विक्रेता तिच्याजवळ आला.याच दरम्यान, जवळ उभ्या असलेल्या एका तरुणाने हातवारे करत तिला त्या विक्रेत्याकडून काहीही घेऊ नये असा इशारा दिला. मात्र, त्या क्षणी नेमका प्रकार तिच्या लक्षात आला नाही.

दुसऱ्या दिवशी एका स्थानिक दुकानदाराकडून तिला धक्कादायक माहिती मिळाली. परफ्युम विक्रीच्या बहाण्याने जवळ येऊन परफ्युमचा वास देत प्रवाशांना गुंगी आणणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे त्याने सांगितले. अशा प्रकारे जवळील दागिने, मोबाईल किंवा मौल्यवान वस्तू चोरी केल्या जात असल्याचेही उघड झाले. मुंबईत फिरताना कशी काळजी घ्यावी याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही वस्तू हातात न घेणे, सुरक्षित अंतर राखणे, वैयक्तिक माहिती शेअर न करणे आणि संशयास्पद वाटल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.विशेषतः महिलांनी अधिक सतर्क राहावे, हेडफोन लावून चालणे टाळावे आणि गरज भासल्यास मोठ्याने ओरडून लोकांचे लक्ष वेधावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.दयाळूपणा महत्त्वाचा असला तरी सुरक्षितता त्याहून अधिक महत्त्वाची आहे. सतर्क राहा, सुरक्षित राहा – हाच या व्हायरल व्हिडिओचा ठळक संदेश आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago