महाराष्ट्र

राजकारणात खुर्ची जिंकली, पण माणूस हरला; शिवसेना मंत्री संजय शिरसाट

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणाला अवघ्या तीन दिवसांतच मोठा वेग आला आहे. आज सायंकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या अनपेक्षित आणि वेगवान घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विविध पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या शपथविधीवर भाष्य केले आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “राजकारणात खुर्ची जिंकली, सार्वजनिक जीवनात खुर्ची जिंकली, पण माणूस हरला आहे,” असे परखड मत त्यांनी मांडले.

शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर काही कालावधी गेल्यानंतर या घडामोडी घडल्या असत्या, तर त्या साहजिक वाटल्या असत्या. मात्र इतक्या तातडीने हालचाली होणे धक्कादायक आहे. कालच राख सावडण्याचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर लगेच सुनेत्रा पवार यांचे मुंबईकडे प्रयाण, विविध राजकीय नेत्यांची वक्तव्ये हे सर्व मनाला पटणारे नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यात आले. शनिवारी मध्यरात्रीच त्या मुंबईत दाखल झाल्या होत्या. आज दुपारी विधानभवनात झालेल्या पक्षाच्या बैठकीलाही त्या उपस्थित होत्या. या सगळ्या घडामोडींवर सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष होते आणि शिवसेनाही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून होती.

संजय शिरसाट पुढे म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर पक्षाची पुढील दिशा, राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कोण असणार, हे सगळे प्रश्न पुढील काळात स्पष्ट होतील. मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडींमधून सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. शासकीय दुखवटाही पूर्ण होण्याआधीच हे राजकारण सुरू झाले, याची खंत त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, यापूर्वी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चांमधून एकत्रिकरणाचा निर्णय सर्वमान्य होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्याची परिस्थिती बदललेली असून, आता राजकारणात सामूहिक निर्णयाचे नवे वारे वाहतील, असे त्यांनी सूचक वक्तव्य केले.

या संपूर्ण प्रक्रियेत शरद पवार यांना कितपत विश्वासात घेण्यात आले, याबाबत शंका असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले. “या निर्णयामध्ये शरद पवार साहेबांचा सल्ला घेतला गेला की नाही, हे स्पष्ट नाही. कदाचित पक्षातील काही नेत्यांनी आणि सल्लागारांनीच हा निर्णय घेतला असावा,” असे ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घडामोडींमध्ये जी भूमिका घेतील, तीच भूमिका शिवसेना घेईल, असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटातील आमदार आणि मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणे ही आमची राजकीय गरज आहे. त्यांच्या निर्णयाला विरोध करण्याची आमची कोणतीही मानसिकता नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

2 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

5 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

6 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

6 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

6 तास ago