Lavc57.107.100
शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी संसदेत नवे कृषी कायदे
छत्तीसगड: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडमधील कृषी मेळाव्यात हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दुर्ग जिल्ह्यातील गिरहोला आणि खपरी गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत नवे कृषी कायदे आणणार असल्याचं स्पष्ट केलं.
या प्रस्तावित कायद्यांमध्ये बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद असणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली. अशा फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून हा गंभीर आर्थिक गुन्हा असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या पिकांशी आणि त्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना यापुढे कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारसाठी शेतकरी आणि त्यांचा सर्वांगीण विकास हे सर्वोच्च प्राधान्य आहे. नव्या कायद्यांचा उद्देश शेतकऱ्यांना मध्यस्थ, फसवणूक आणि बनावट कृषी साहित्यापासून संरक्षण देण्याचा आहे.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पारंपारिक भातशेतीसोबतच फळे, भाज्या आणि विविध पिके घेण्याचा सल्ला दिला. फळझाडे आणि झाडांची लागवड केल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकतं, असं त्यांनी सांगितलं. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जात असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांची पिके आणि त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार निर्णायक पावलं उचलणार असल्याचं सांगत, बनावट बियाणे-खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई निश्चित केली जाईल, असा ठाम विश्वास केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…