महाराष्ट्र

वाराणसी येथील शास्त्र संग्रहालय आणि अनुसंधान केंद्राचे उद्घाटन

वेद शास्त्र, वैदिक योग, पर्यावरण, औषधी वनस्पती शास्त्र, वास्तू शस्त्राचे मिळणार प्रशिक्षण

वाराणसी: वेदांमध्ये आद्यस्थानी वसलेल्या ईश्वरास माझे वंदन आहे, अशी नम्र भक्तिभावना संत ज्ञानेश्वरांनी ‘ओम् नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या’ अशा शब्दांत व्यक्त केली होती. आज येथे उपस्थित राहिल्यामुळे देशाच्या त्या प्राचीन ज्ञानपरंपरेशी जोडला गेल्याची पवित्र भावना माझ्या मनात निर्माण झाली असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. श्री धर्मसंघ मणी मंदिर दुर्गाकुंड येथे उभारण्यात आलेल्या शास्त्र संग्रहालय आणि अनुसंधान केंद्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आज पुरी जगन्नाथ येथील रथयात्रेला सुरुवात होत असतानाच या केंद्राचे उद्घाटन होत असल्याने एक अनुपम योग जुळून आला असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी उत्तर प्रदेशचे आयुषविज्ञान मंत्री दयाशंकर मिश्रा, शास्त्र संग्रहालयाचे संचालक रामानंद तिवारी, पद्मश्री आचार्य गणेश्वर शास्त्रीजी, उपेंद्र त्रिपाठी, धर्म संसदेचे महामंत्री आचार्य जगजित पांडे, भजन बोबडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना, स्वामी करपात्री जी महाराज यांचा हा मणी मंदिर आश्रम म्हणजे, सनातन हिंदू धर्माचे एक केंद्र आहे. इथे आध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संगम अनुभवता येतो. आचार्य गणेश्वर शास्त्रीजी यांनी अयोध्येतील रामलल्ला प्राण प्रतिष्ठेचा आणि काशी विश्वनाथ मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा शुभमुहूर्त काढला होता. आज या मंदिरात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. दुर्गाकुंड येथील हे संग्रहालय केवळ संग्रहालय नसून आपली समृद्ध परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे मत व्यक्त केले.

या केंद्रामध्ये वैदिक योग, पर्यावरण, औषधी वनस्पती यावरील कोर्सेस सुरू होतील, वैदिक वास्तुशास्त्र, विज्ञानाशी संबंधित अनेक कोर्सेस इथे सुरू होतील. तसेच वैदिक ज्ञानाचे महत्त्व पटवून देणारे थ्रीडी संग्रहालय देखील इथे उभे राहिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच प्राचीन वेदांचे आपल्या भाषणातून दाखले देतात त्यामुळे जगभरात त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. जगभरातून वेद आणि शास्त्रोक्त विद्या शिकण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी आगामी काळात हे एक हक्काचे केंद्र ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आचार्य गणेश्वर शास्त्रीजी आणि शास्त्र संग्रहालयाचे संचालक रामानंद तिवारी यांच्याकडून या केंद्राची माहिती जाणून घेतली. तसेच या केंद्रात ठेवण्यात आलेली जुनी पुस्तके आणि ग्रंथसंपदा यांचीही यावेळी माहिती घेतली. तसेच या ठिकाणी डिजिटल स्वरूपात जतन केलेल्या साहित्याची देखील मान्यवरांच्या साथीने पाहणी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

4 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

4 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

4 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

4 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

4 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

4 तास ago