महाराष्ट्र

पुणे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी इंद्रजीत जाधव

पुणे (प्रतिनिधी): पुणे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी इंद्रजीत जाधव तर सचिवपदी मनोहर वन्नम यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य लिपिक वर्गीय संघटना क्र. ६१५ अंतर्गत पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या संघटनेत हा महत्त्वाचा नेतृत्वबदल झाला आहे.

सन २०१५ पासून जिल्हाध्यक्ष म्हणून शेखर गायकवाड व सचिव म्हणून किशोर कुलकर्णी हे कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला होता. त्या पार्श्वभूमीवर संघटनेची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत मावळते अध्यक्ष व सचिव यांचे राजीनामे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यानंतर रिक्त झालेल्या पदांवर नवीन नियुक्त्या करणे आवश्यक असल्याने अध्यक्ष व सचिवपदासाठी चर्चा करण्यात आली. संघटनेत यापूर्वी तालुकाध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी केलेले, सध्या उपाध्यक्षपद भूषवित असलेले इंद्रजीत जाधव यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने त्यांच्या नावास एकमताने अनुमोदन दिले. त्याचप्रमाणे मनोहर वन्नम यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, कर्मचारी हिताच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

या वेळी राज्य कार्याध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, मावळते अध्यक्ष शेखर गायकवाड, मावळते सचिव किशोर कुलकर्णी यांच्यासह नानासाहेब मार्कड, बालाजी पारसकर, विकास पापळ, शशी कालेकर, करंजकर मॅडम, प्रशांत किराड, वैभव लवटे, रवलिंग यादव, सुनील भापकर आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवीन अध्यक्ष इंद्रजीत जाधव व सचिव मनोहर वन्नम यांनी संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी एकजुटीने संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

20 वर्षांत 40 बदल्या! तुकाराम मुंढेंनाही मागे टाकणाऱ्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कारकीर्द

मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा…

8 तास ago

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…

16 तास ago

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…

16 तास ago

एका वर्षात हजारो सरकारी शाळा घटल्या; महाराष्ट्रातही ३५७ शाळांना फटका

नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची…

16 तास ago

महागाईचा भडका; घरखर्चाचे गणित कोलमडले! उत्पन्न जैसे थे, मात्र खर्चाचा आलेख वाढता

नाशिक : महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह…

16 तास ago

NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद; १ कोटींहून अधिक नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common…

16 तास ago