महाराष्ट्र

जरांगे पाटलांच्या विधानानं घातपाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; मुंडेंवर थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताज्या विधानामुळे घातपाताचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. यातील अमोल खुणे या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे.

या मागणीला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. “मुंडेंनी माझ्या घातपाताचा कट रचला आहे”, असा गंभीर दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, आरोप-प्रत्यारोपांची ही मालिका इथेच थांबलेली नाही. बीड जिल्ह्यातील एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये स्वतःला ‘कराड समर्थक’ म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने मनोज जरांगे पाटील यांना थेट गोळ्या घालून मारण्याची धमकी दिल्याचा दावा समोर आला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे याआधी जरांगे पाटील यांनी दिलेलं नार्को टेस्टचं आव्हान मंत्री धनंजय मुंडे यांनीही स्वीकारलं होतं. त्यानंतर काही काळ दोघांमधील वाद निवळल्याचं चित्र होतं. मात्र, अमोल खुणेला हत्येच्या कटप्रकरणातून जामीन मंजूर झाल्यानंतर हा संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटामागे नेमकं कोण आहे? जरांगेंच्या आरोपांना धनंजय मुंडे प्रतिआव्हान देणार का? तसेच बीडमधील हा वाढता राजकीय संघर्ष आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर काय परिणाम करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

13 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago