महाराष्ट्र

मराठी माणसाचा अपमान; पण महाराष्ट्रातील ४५ खासदार गप्प का

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी निशिकांत दुबे यांना जय महाराष्ट्र बोलत तिथून काढता पाय घ्यावा लागला. यानंतर आता मनसेकडून या खासदारांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित खासदारांना रोकडा सवाल करण्यात आला आहे.

मराठी माणसांना आपटून आपटून मारेन…, अशी दर्पोक्ती करणाऱ्या भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी संसदेत घेराव घातला आणि त्यांना त्यांच्या बेताल विधानाचा जाब विचारला. यासाठी तिन्ही खासदार महोदयांचे मनापासून अभिनंदन. पण महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का आहेत ? मराठी माणसाचा अपमान या ४५ खासदारांना सहन कसा होऊ शकतो ? तुमच्यासाठी मराठी माणूस आणि अपमान हा अस्मितेचा विषय नाही का? अशी विचारणा मनसेकडून करण्यात आली आहे. मनसेने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

काँग्रेसच्या महिला खासदारांची कृती अभिमानास्पद

काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी जी कृती केली, ती अभिमानास्पद होती. खरेतर काँग्रेसची भूमिकाही हिंदीधार्जिणी असते. पण पक्ष न पाहता या तिघींनी निशिकांत दुबेंसारख्या नेत्याला जाब विचारला. हे करण्यासाठी धैर्य लागते. हे धैर्य महिला खासदारांनी दाखवले, त्याबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात येईल. आम्हाला पुरूष खासदारांकडून अपेक्षा होती. महाराष्ट्रात जन्मलेले खासदार आपल्या भाषेसाठी संसदेत निशिकांत दुबेंना जाब विचारतील, असे वाटले होते. परंतु, त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. याउलट काँग्रेसच्या महिला खासदारांनी पुढाकार घेऊन मराठीचा सन्मान केला, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.

दरम्यान, आपण सगळे मराठी म्हणून एकत्र येत आहोत, हे जास्त महत्त्वाचे आहे. पक्ष कोणता, हे महत्त्वाचे नाही. पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबाबत त्यांनी जाब विचारला. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

9 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

9 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

9 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

9 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

9 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

9 तास ago