मुंबई: विधानपरिषदेचे सदस्य किरण सरनाईक यांनी आज राज्यातील शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आलीय त्या समितीने ज्या शिफारसी केल्या आहेत त्या शिफारशिंची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने काय भुमिका घेतलीय.
महिला शिक्षकांवर समुपदेशन करण्याची जबाबदारी देण्यात आलीय परंतु त्याचे मूल्यमापन करणारी यंत्रणा आहे का? त्याची अंमलबजावणी होतेय का? असे प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले कि, समितीने चांगल्या सूचना केल्या आहेत त्याची प्रभाविपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. यासंदर्भात संबंधित विभाग लक्ष देईल. गाव पातळीवर अनेक समित्या आहेत परंतु ज्या समित्यांची आवश्यकता नाही अशा समित्या कमी करणे, ज्या समित्यांची आवश्यकता आहे त्यावर काम करणे हे धोरण शालेय शिक्षण विभागाने स्वीकारले आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…