आरोग्य

तुम्ही रात्री घरातील Wifi बंद न करता झोपता का? उद्भवू शकतील हे गंभीर आजार

जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे.

त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीडमध्ये इंटरनेट वापरु शकतात. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले की तुम्ही त्याला 5-6 डिव्हाइस आरामत जोडू शकता. काही वाय-फाय राउटरला तर त्याहून जास्त डिवाइस जोडले जाऊ शकतात.तुम्ही कसा प्लान घेताय त्यावर ते अवलंबून असतं.

रात्री वायफायचं राउटर बंद करणं किती गरजेच…

मुख्य म्हणजे वायफाय वापराला जातो तो रात्री लागते. कारण चित्रपटांपासून ते सीरिजपर्यंत सगळेजण टिव्हीवर किंवा मोबाईलवर पाहायला तोच निवांत वेळ असतो. त्यामुळे बहुतेक घरात रात्रंदिवस हा वायफाय राउटर सुरु असतो. त्यामुळे जवळपास 99 टक्के लोकं वायफाय सुरुच ठेवून झोपतात. पण हे अत्यंत चुकीचं असून. यामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रात्री वायफाय राउटर बंद करणं गरजेचं आहे. का ते पाहु.

रात्री वायफाय बंद का केला पाहिजे…

1) जर तुमच्या घरातील वायफाय राउटर रात्रभर चालू राहिल्यास त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे काही वेळाने तुमच्या शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. हे राउटरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होतं, आणि याबद्दल बहुतेकांना नक्कीच माहिती नसेल.

2) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे, शरीरात रोग उद्भवू शकतात जे खूप धोकादायक आहेत आणि आपल्या शरीरावर वाईट परिणाम करू शकतात.

3) वाय-फाय रेडिएशनच्या सततच्या संपर्कामुळे पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. 2015 च्या अभ्यासात असे आढळून आले की जे लोक वारंवार वायरलेस इंटरनेट वापरतात त्यांच्यात वायर्ड इंटरनेट वापरकर्त्यांच्या तुलनेत शुक्राणूंची गती कमी होतेय.

4) 2015 च्या अभ्यासात वाय-फायच्या संपर्कात असलेल्या सशांमध्ये हृदयाच्या लय आणि रक्तदाबातील बदल आढळून आले आहेत . हृदय व रक्तवाहिन्यांवरही या रेडिएशनचा प्रभाव पडतो जो अत्यंत हानिकारक आहे.

5) रात्री वायफाय बंद केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.

6) रात्री वायफाय बंद केल्याने विजेची बचत होते.

7) रात्री वायफाय बंद केल्याने कनेक्शन सुरक्षित राहते आणि हॅकिंगचा धोका कमी होतो.

तर अशा पद्धतीने रात्रभर वायफाय सुरु ठेवून तुम्ही त्याच्या संपर्कात झोपत असाल तर नक्कीच गंभीर समस्यांना सामोर जाव लागू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात होणा-या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करायचं असेल, तर तुम्ही वायफाय राउटर वापरल्यानंतर तो बंद करण्याचा प्रयत्न करा. किंवा झोपताना तरी वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

9 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

9 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

14 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

14 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

14 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

14 तास ago