महाराष्ट्र

रेशन दुकानदार त्रास देतोय तक्रार करा आणि मिळवा न्याय

जर रेशन दुकानात तुम्हाला धान्य कमी दिलं जात असेल, जास्त पैसे मागितले जात असतील किंवा विनाकारण अडचणी निर्माण होत असतील, तर आता तुम्ही थेट ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता! सरकारने या समस्यांसाठी टोल-फ्री क्रमांक आणि वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

रेशनवर मिळणाऱ्या वस्तू:

गहू तांदूळ  तेल साखर डाळी

जर दुकानदाराने वस्तू कमी दिल्या, जास्त पैसे घेतले किंवा धान्य वेगळ्या विक्रेत्याला विकले, तर तुम्हाला आता त्वरित *तक्रार करण्याचा अधिकार* आहे!

रेशनसंबंधी प्रमुख समस्या:

धान्य कमी प्रमाणात देणे

अनावश्यक शुल्काची मागणी

नवीन रेशन कार्डसाठी अडथळे

दुकानात वेळेवर सेवा न देणे

तक्रार नोंदणीसाठी उपाय:

टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा

महाराष्ट्रासाठी:* 1967 / 1800-224-950

तुमची तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्वरीत कार्यवाही केली जाईल.

ऑनलाईन वेबसाईटवर तक्रार करा

https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx

वेबसाइटवर तुमचे नाव, रेशन कार्ड क्रमांक, समस्या यांचा तपशील द्या.

तक्रारीचा पाठपुरावा ऑनलाईन करू शकता.

तहसील कार्यालयाची दखल

तुमच्या तक्रारीवर तहसील कार्यालयाकडून थेट कारवाई होईल. आता कुठल्याही त्रासाशिवाय करा तक्रार आणि मिळवा हक्काचे धान्य

महत्वाचे:

टोल-फ्री क्रमांकावर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.  तक्रारीसाठी वेळ वाया न घालवता त्वरित संपर्क साधा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

4 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago