आरोग्य

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात. पण सोबतच काही लोक एक्सरसाईज दरम्यान काही चुका करतात ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. बरेच लोक एक्सरसाईज केल्यानंतर लगेच पाणी पितात. असं करणं आरोग्यासाठी नुकसान कारक ठरू शकतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जास्त पाणी पिऊ नका

तुम्ही जर खूप जास्त एक्सरसाईज केली असेल आणि अधिक घाम गेल्यामुळे जास्त तहान लागली असेल तर पाणी एक-एक घोट करून प्यावं. एक्सरसाईजनंतर लगेच ढसाढसा पाणी पिणं महागात पडू शकतं.

पोट बिघडू शकत

एकाचवेळी खूप जास्त पाणी प्यायल्याने पोटात गडबड होऊ शकते. कधी कधी असं केल्याने हायपोनेट्रेमियाही होऊ शकतो.

काही वेळ थांबून प्यावं पाणी

एक्सरसाईज केल्यावर लगेच पाणी पिऊ नका. काही वेळ थांबून आधी रिलॅक्स व्हा आणि नंतर हळूहळू पाणी प्या. याने शरीर शांत होण्यास मदत मिळेल.

हृदयाला द्या आराम

एक्सरसाईज केल्यानंतर हृदयाला काही वेळ आराम द्यायला हवा. अचानक पाणी प्यायल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि हृदयावर अधिक दबाव पडतो. ज्यामुळे हृदयासंबंधी समस्या होऊ शकते.

एक्सरसाईज करण्याचे फायदे

वजन कमी होतं

मूड चांगला राहतो

व्यायामाने ऊर्जा वाढते

झोप चांगली लागते

हृदयरोगाचा धोका कमी होतो

डिप्रेशन, चिंता दूर होते

शरीर आणि हाडं मजबूत राहतात

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

17 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago