आरोग्य

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं. किडनी स्टोन झाल्यावर पोटात दुखतं आणि लघवी करतानाही त्रास होतो. किडनी स्टोन झाल्यावर असह्य वेदना होतात. अशात काही औषधांनी किंवा सर्जरी करून किडनी स्टोन बाहेर काढले जातात.

किडनी स्टोन झाल्यावर कोणती फळं खावीत

१) पाणी असलेली फळ

किडनी स्टोनच्या रूग्णांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याशिवाय पाणी भरपूर असलेली फळं खाण्याचाही सल्ला दिला जातो. कलिंगड, खरबूज, नारळ पाणी, काकडी सारख्या फळांमध्ये भरपूर पाणी असतं. यांचं सेवन करून शरीरात पाणी वाढतं. शरीरात पाणी कमी असेल तर किडनी स्टोनची समस्या वाढते.

२) आंबट फळ

किडनी स्टोन झाला असेल तर आंबट म्हणेज सिट्रिक फळांचं अधिक सेवन करायला हवं. यासाठी तुम्ही डाएटमध्ये संत्री, लिंबू, द्राक्ष या फळांचा समावेश करावा. ही फळं खाऊन किडनी स्टोनची समस्या दूर करण्यास मदत मिळेल.

३) कॅल्शिअम असलेली फळ

तुमच्या आहारात फळांचा समावेश अधिक केला पाहिजे. किडनी स्टोन झाल्यावर कॅल्शिअम असलेल्या फळांचं अधिक सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. द्राक्ष, जांभळं आणि कीवी या फळांमध्ये भरपूर कॅल्शिअम असतं.

४) कोणती फळं खाऊ नये

किडनी स्टोनची समस्या झाल्यावर काही फळांचं सेवन कमी करण्याचा किंवा न करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काही भाज्या आणि दाण्यांचंही सेवन करू नये. किडनी स्टोनची समस्या झाल्यावर डाळिंब, पेरू ही फळं खाऊ नयेत. तसेच भाज्यांमध्ये वांगी, टोमॅटो आणि रताळे कमी खावेत. तसेच ड्रायफ्रूट्सचं सेवनही टाळलं पाहिजे. या गोष्टींमुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

7 मिनिटे ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

2 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago