मुंबई: राज्यातील समृद्ध कलापरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आर्ट गॅलरी उभारण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुंबईतील Jehangir Art Gallery येथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे तसेच प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, नव्या गॅलरीमध्ये संस्थेतील ऐतिहासिक व दुर्मिळ कलाकृतींचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी खुले प्रदर्शन विभाग तसेच आधुनिक कलाप्रदर्शनासाठी स्वतंत्र दालन उभारले जाईल. आजचा कलाकार केवळ ब्रश-कॅनव्हासपुरता मर्यादित नसून डिजिटल आर्ट, इन्स्टॉलेशन आदी आधुनिक माध्यमांतून तो जगाशी संवाद साधत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्य शासनाने विद्यार्थी विभागातील पुरस्कारांची संख्या ३१ वरून ६८ इतकी वाढवली असून पारितोषिकाची रक्कम १ लाख ७० हजार रुपयांवरून ५ लाख ८ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. कलाकार विभागातील १५ पारितोषिकांची रक्कमही ७ लाख ५० हजार रुपयांवरून ११ लाख २५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोविड काळात प्रलंबित राहिलेले दोन वर्षे आणि चालू वर्ष असे एकूण तीन वर्षांचे Vasudev Gaitonde Kala Jeevan Gaurav Puraskar यंदा प्रदान करण्यात आले. शिल्पकला, उपयोजित कला आणि रेखा-रंगकला विभागातील किशोर ठाकूर, शि. द. फडणीस आणि वासुदेव कामत या नामवंत कलाकारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय ज्येष्ठ कलाकार विलास शिंदे यांचा राज्य शासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कला संचालनालयाच्या वतीने कलाक्षेत्रातील पदविका परीक्षांना बोर्ड परीक्षेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या परीक्षांसाठी २०० हून अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. तसेच Sir J. J. School of Art ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ६५ वे राज्य कला प्रदर्शन ११ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनातील वैविध्यपूर्ण कलाकृतींचा रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…