महाराष्ट्र

पत्रकारीता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाके-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर: समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाच्या योजना, उपाययोजना पोहोचविणे हे प्रशासनाचे काम असते तर पत्रकारीते मार्फत जनतेपर्यंत माहिती पोहोचविली जाते, त्यामुळे पत्रकारीता आणि प्रशासन ही समाजरथाची दोन चाके आहेत, परस्परांच्या सहकार्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दर्पण दिनाचे (दि. ६) औचित्य साधून आज पत्रकार सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमास विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष डॉ. माधव सावरगावे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, तहसिलदार रमेश मुनलोड, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे आदी उपस्थित होते.

प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ज्या काळात बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारिता केली. तो काळ, नंतरचा स्वातंत्र्य संग्रामाचा काळ आणि आताचा काळ यात फरक आहे. प्रश्नांचे स्वरुप बदलले आहे. असे असले तरी पत्रकारितेची जबाबदारी तिच आहे. सध्या संस्कृती आणि संस्कारापासुन व्यक्ति दुरावत असल्याचा प्रश्न समाजापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे कन्याभ्रुण हत्या, गर्भलिंग निदान, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार, वृद्धावस्थेत आई वडिलांचा मुलांनी सांभाळ न करणे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत तर त्यासाठी समाज प्रबोधन करणे आवश्यक असून ती जबाबदारी पत्रकारांनी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. पत्रकारांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासन पुढाकार घेईल, असेही सांगितले.

डॉ. माधव सावरगावे म्हणाले की, पत्रकारांचे विविध प्रश्न असतात ते सोडविण्यासाठी शासन व शासनाने नियुक्त केलेल्या समित्या आपल्या स्तरावर प्रयत्न करीत असतात. त्यामाध्यमातून पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडविण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पत्रकार यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. पत्रकार हे प्रशासनाला सहकार्य करीत असतात. चांगला समाज घडविण्यासाठी पत्रकार हे नेहमीच प्रशासनासोबत आहेत, असे मत डॉ. सावरगावे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सिद्धार्थ गोदाम, डॉ. अब्दुल कदीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मिलिंद दुसाने यांनी, सुत्रसंचालन कांचन जोशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.मीरा ढास यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्रमुख पत्रकार उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

9 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

9 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

9 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

17 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

18 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

18 तास ago