पावसाळ्यात पोषक खोबरे
चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात आवश्यक असणारी गोडव्याची ऊर्जा व शक्ती देते. खोबरे पचायला जड आहे. त्याचसाठी खोबरे भाजून मगच त्याचे सारण तयार करतात, त्यात पुन्हा मोदक उकडवले जातात, जेणेकरुन खोबरे पचायला जड जाऊ नये. खोबरं शरीरामध्ये थंडावा वाढवते. खोबर्याला दिलेली गुळाची जोड मोदकांना रुचकर तर करतेच आणि गुळाचा उष्ण गुण खोबर्याचा थंडावा नियंत्रणात ठेवतो. खोबरं स्निग्ध आहे. मात्र मोदक करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि मुख्यत्वे भाजलेल्या खोबर्यामुळे मोदक कोरडे होऊ शकतात. या कोरडेपणावर मात करण्यासाठी मोदक खाताना त्यावर गरमगरम साजूक तुपाची धार सोडली जाते. एखादा पदार्थ तयार करताना आणि त्याचे सेवन करताना आपल्या परंपरेने किती सूक्ष्म विचार केलेला आहे, हे इथे वाचकांच्या इथे लक्षात येईल.
वातशामक नारळ
नारळ वातशामक आहे. त्याची गुणवैशिष्ट्ये याप्रमाणे
1) साहजिकच पावसाळ्यात प्रकुपित होणार्या वाताला व अस्थी, सांधे, स्नायु, नसा- कंडरा संबंधित विविध वातविकारांना नियंत्रणात ठेवण्यात खोबरे निश्चितच उपयुक्त सिद्ध होते. त्यातही जे अशक्त, कृश व वातप्रकृतीचे आहेत त्यांना आवश्य़क असणारी उर्जा (energy) ओल्या खोबर्यामधुन मुबलक म्हणजे ४४४ ग्रॅम इतकी मिळते. पावसाळ्यात विविध वातविकारांनी त्रस्त असणार्यांना हाडांना पोषण देणारा फॉस्फ़रस ओल्या खोबर्यामधुन २४० मिलिग्रॅम इतका मिळतो. ओल्या खोबर्यामधुन कॅल्शियम कमी मिळते, मात्र सुक्या खोबर्यामधुन भरपूर (४००मिग्रॅ) मिळते.
मांसवर्धक नारळ
2) नारळाला आयुर्वेदाने मांसप्रद (मांसवर्धक) सांगितले आहे आणि प्रत्यक्षातही स्नायुंचे बल वाढवण्यासाठी नारळ उपयोगी पडतो, कारण ओले खोबरे ४.५% प्रथिने पुरवते. वाताच्या रुक्षत्वाला (कोरडेपणाला) कमी करण्यास आवश्यक स्नेह (चरबी) खोबरे शरीराला तब्बल ४१.६ ग्रॅम इतक्या प्रमाणात देते. खोबरेल तेलाचा उपयोग करणार्यांना सहसा वातविकार त्रास देत नाहीत यामागील महत्त्वाचे कारण त्यामधील वातविरोधी स्नेहाचे मुबलक प्रमाण हे आहे. रक्तवर्धक लोह (iron) ओल्या खोबर्यामधून १.७ तर सुक्या खोबर्यामधुन ७.८ मिग्रॅ इतके मिळते.
बलवर्धक खोबरे
3) खोबरे शरीरावर मांस वाढवणारे, शुक्रवर्धक (वीर्य व कामेच्छावर्धक), बलवर्धक असल्याचे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. एकंदर पाहता चवीला रुचकर गोड असणारे खोबरे अतिशय पौष्टीक आहे. ओले खोबरे शरीराला ३६.३ ग्रॅम इतका ओलावा (moisture) पुरवते. हा गुण असला तरी पावसाळ्याच्या आरंभी अर्थात प्रावृट् ऋतुमध्ये शरीरातला ओलावा आधीच वाढलेला असताना खोबर्याचे सेवन योग्य नाही. मुसळधार पाऊस पडत असताना, सभोवतालचे वातावरण ओलसर असताना ज्यांना सर्दी, कफ आदी विकार होतात त्यांनी त्या स्थितिमध्ये ओले खोबरे टाळावे. सुके खोबरे वापरायला हरकत नाही. कारण त्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण केवळ ४.३ ग्रॅम असते. मात्र सुके खोबरे पचायला जड आहे हे विसरु नये. तसेही खोबरे ओले असो वा सुके पचायला जडच असते.
(सोशल मीडियावरून साभार)
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…
पुणे: हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या…