महाराष्ट्र

न्या. सुनील शुक्रे महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त; राज्यपालांच्या हस्ते शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. लोकभवन, मुंबई येथे झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी न्या. शुक्रे यांना पदाची शपथ दिली.

न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा किंवा वयाची ७० वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत राहणार आहे.

शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य भास्कर जाधव, मावळते लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, गोवा लोकायुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे सदस्य आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी न्या. सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदेमातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली.

न्या. सुनील शुक्रे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर नागपूर विद्यापीठातून घटनात्मक कायद्यात एलएल.एम. पदवी प्राप्त केली.

न्यायिक सेवेत त्यांनी कोल्हापूरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे रजिस्ट्रार (प्रशासन), महाराष्ट्र न्यायिक अकादमी, उत्तन येथील सहसंचालक आणि नागपूरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश अशा विविध पदांवर काम केले. मार्च २०११ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल म्हणून पदभार स्वीकारला. २०१३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पदोन्नती झाली.

ऑक्टोबर २०२३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या (MSBCC) अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आता त्यांच्यावर महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेचे नेतृत्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

4 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

4 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

5 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

5 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

5 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

10 तास ago