महाराष्ट्र

करुणा शर्मांनी दिली धनंजय मुंडे यांना मोठी ऑफर, दुसऱ्या पत्नीसोबत त्यांच्या घरी

मुंबई: धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाऊन काही दिवस उलटली आहेत. मात्र, त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नाहीये. धनंजय मुंडेंनी बंगला सोडला नसल्याने छगन भुजबळ यांना मंत्री होऊनही शासकीय निवासस्थान मिळू शकले नाही.

माझ्या मुलीची शाळा मुंबईत आहे आणि माझे आजारपण सुरू असल्याचे कारण मुंडेंची यावर दिले. धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला अघ्याप सोडला नसल्याने त्यांच्यावर मोठा दंड लावण्यात आलाय. धनंजय मुंडे हे शासकीय बंगला कधी सोडणार यावरून चर्चा सुरू असतानाच करुणा शर्मा मुंडे यांनी मोठे विधान केले.

करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन ते चार घर आहेत. पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझमध्येही. जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावे. मी त्यांना माझ्या घरात घेईल. पुढे त्या बोलताना म्हणाल्या की, धनंजय मुंडेंसाठी 42 लाख रुपयांचा दंड काहीच नाहीये. धनंजय मुंडे पुन्हा कधीही मंत्री होणार नाहीत, त्यांना त्यांचे आमदारपदही गमवावे लागणार आहे.

न्यायालयाने धनंजय मुंडे यांना 10000 रुपयांचा दंडही लागू केला आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर उपस्थित केलेल्या प्रश्नाचे करुणा मुंडे यांनी स्वागत केले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा निवडणूक आयोग धनंजय मुंडेंना पाठिंबा देत होते. करुणा मुंडे म्हणाल्या की, निवडणूक आयोग सत्तेत असलेल्या मोठ्या नेत्यांसाठी काम करते.

आता करुणा मुंडे यांनी दिलेली ऑफर धनंजय मुंडे स्वीकारणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धनंजय मुंडे यांनी सततच्या टीकेनंतरही सातपुडा हे निवासस्थान रिकामे केले नाहीये. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता धनंजय मुंडे दंड कधी भरणार आणि शासकीय बंगला कधी सोडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत थेट राजीनामा दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago