महाराष्ट्र

पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिचवर आपण प्रयत्नच करतोय; रुपाली चाकणकर

पुणे: सोशल मीडिया आता मोठ्या प्रमाणात आपली भूमिका बजावत आहे. मात्र मी आपल्यातील अनेकांचे सोशल मीडियावर अकाउंट बघते. तेव्हा त्यांनी आपल्या पक्षाच्या पेजला फॉलो केलेलं नसते, हे अतिशय खेदजनक आहे, अशी खंत राष्ट्रवादीअजितपवारगटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसपक्षाच्या पदाधिकारी आढावा बैठकीचे पुण्यात आयोजन करण्यात आल. यावेळी त्या बोलत होत्या. मात्र या बैठकीला समिश्र प्रतिसाद मिळाल्याने आणि पुणे होम पिच असताना भरघोस प्रतिसादन मिळाल्याने काहीसा नाराजीचा सुर या बैठकीत उमटल्याचे बघायला मिळत आहे.

पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं; मात्र, अजूनहीआपण प्रयत्नच करतोय

दरम्यान, या आढावा बैठकीत 2 जिल्हा पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी उघडनाराजी बोलून दाखवली आहे. पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिच म्हणून पुणे ओळखलं जातं, तिथे आपण अजूनही प्रयत्नच करतोय, असं वक्तव्यही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केलंय. निरोप सर्वांना देऊनही अनेक जणं उपस्थित नसल्याची खंतहीत्यांनी बोलून दाखवली. आम्हीहे यासाठी सांगतोय कारण सुनेत्रा वहिनी हे सर्व पहात असल्याचंही चाकणकर म्हणाल्या. तरयातून दादांच्या पुण्यातील राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यां मधील वाद यातून प्रामुख्याने दिसून आला आहे.

राजकिय निर्णय घेताना स्वाभिमान आणि स्वावलंबन जपलं पाहिजे; सुनेत्रा पवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकशाहीची पहिली पायरी आहे. निवडणुकीत उभे राहण्याची प्रत्येकाला संधी मिळेल असे नही. मात्र सक्रिय सहभाग हा महत्वाचा आहे. ही संधी आपल्याला मिळेल आणि त्या उद्देशान काम करणं गरजेचं आहे. चांगल्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवरून दिसते. महिला कुटुंबियांशी चांगला संवाद साधू शकतात. आरोग्य, शिक्षण, पाणी याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. निवडणुकीत संपर्क वाढवायला हवा. पाणी, आरोग्य, रस्ते, महिला सुरक्षा याला प्राधान्य दिलं पाहिजे. प्रत्येक घरात राष्ट्रवादीची महिला रणरागिणी पोहचली पाहिजे. राजकिय निर्णय घेताना स्वाभिमान आणि स्वावलंबन जपलं पाहिजे. सह पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवा. शाहू, फुले, आंबेडकर हा आपल्या पक्षाचा पाया आहे. अशा सूचनाही सुनेत्रा पवार यांनीकेल्याआहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

13 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

13 तास ago