महाराष्ट्र

क्रिडाई ने एसटीची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे…

मुंबई: राज्यभरात पसरलेल्या एसटीच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रीडाई (CRDAI) या संस्थेने आपला योगदान द्यावे. असे आवाहन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज ने भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देते प्रसंगी बोलत होते.

ते म्हणाले, एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्याचे आम्ही शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण केले असून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासाकाकडून बांधून घेणे त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100 खाटांचे अद्यावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनल सारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे.

या बदल्यात संबंधित विकासाकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यवसायिक क्षेत्र विकसित करता येईल. अशा पध्दतीचे सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी सूचना आणि प्रस्ताव क्रीडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेत असे आवाहन यावेळी मंत्री सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रिडाई चे अध्यक्ष श्री. डॉमनिक रोमेल (Domnic Romell) व इतर पदाधिकारी, विकासक, वास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी

मंत्री, परिवहन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

2 तास ago