महाराष्ट्र

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, ड्रग पेरण्याची धमकी; सरकारवर विजय वडेट्टीवारांचा घणाघात

पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शेतकरी कर्जमाफीवर सरकारला धारेवर धरले; लोकशाही दडपण्याचा आरोप

नागपूर: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असून त्यांना ड्रग पेरण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी सरकार त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” असले तरी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना “५० ग्रॅम ड्रगची पुडी ठेवीन” अशी धमकी दिली जात असल्याचे अत्यंत गंभीर आहे. अशा धमक्या देणाऱ्या पोलिसांकडे ड्रग्ज आले कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भूमिका घेतली असून राज्यभर काँग्रेसने आंदोलन केले आहे. अनेक ठिकाणी पालकही रस्त्यावर उतरल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी केली.

पेपरफुटी प्रकरणावर बोलताना त्यांनी गेल्या दहा वर्षांत अनेक स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेल्याचा आरोप केला. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका करत, विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा सरकारने स्वतःच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी, असे ते म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. कर्जमाफीचे आकडे फुगवून सांगितले जात असून लाभार्थ्यांच्या यादीतील गोंधळामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत सरकारने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

1 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

1 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

2 तास ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

2 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

2 तास ago

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

2 तास ago