मुंबई: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच आमदार शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
अजितदादा पवार यांच्या आठवणींनी धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांच्यासह उपस्थित अनेक नेते आणि कार्यकर्ते भावूक झाले. “दादांचा जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करावा लागत आहे,” या भावनेने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून तसेच कर्नाटकातूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रदेश कार्यालयात उपस्थित राहून दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन केले.
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…
शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…
मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…