पुणे: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात महाआरती आणि मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.
यानंतर, शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा गणपती मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले. हा सोहळा भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला बाळासाहेब मालुसरे, आनंद गोयल, नितीन पवार यांच्यासह शिवसेना संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, कार्यालयीन प्रमुख सुधीर जोशी आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
गुढीपाडवा हा विजय, समृद्धी आणि नव्या वर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक मानला जातो. या निमित्ताने पारंपरिक संस्कृतीचा गौरव करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्साहात गुढीपाडव्याचा आनंद साजरा केला.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…