महाराष्ट्र

महादेव मुंडेंचा गळा चिरला; चेहरा, मान अन् हातावर तब्बल 16 वार

पोस्टमार्टम रिपोर्टमधून गुन्हेगारांचं क्रौर्य समोर आलं

बीड: परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून, यामध्ये अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. आधी महादेव मुंडेंचा गळा कापला. तो तब्बल 20 सेंमीपर्यंत लांब, 7 सेंमी रुंद आणि 3 सेंमी खोल असा हा वार होता.त्यानंतर मुंडेंच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार केलेले होते. मुंडे यांच्या अंगावर तब्बल 16 वार आहेत. प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

21 ऑक्टोबर रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला होता. 22 ऑक्टोबर रोजी 12:15 ते 1:30 असे सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन चालले. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियान, ब्राऊन कलरचा शर्ट होता. लाल करदोडा आणि पाकीट होते. चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. सव्वा तास हे पीएम चालले होते. या घटनेला तब्बल 20 महिने लोटले त्यानंतरही यातील आरोपी निष्पन्न नाहीत. त्यामुळेच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करत आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतचे वृत्त लोकमत या वृत्तसंस्थेने दिले आहे.

नराधमांनी श्वसननलिका कापली

महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्याने त्यांची श्वसननलिका कापली गेली होती. शिवाय मोठ्या रक्तवाहिन्याही तुटल्या होत्या.महादेव मुंडे यांनी दोन्ही हाताने या सगळ्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या डाव्या आणि उजव्या हातावर अंगठ्याजवळ, तळहातावर आणि मधल्या बोटाजवळ जखमा झालेल्या होत्या. तसेच खाली पडल्यानंतर त्यांच्या डाव्या गुडघ्यालाही खरचटलं असल्याची नोंद आहे.

तोंडापासून कानापर्यंत वार

मानेवर वार करत असताना तो चुकवल्यामुळे तोंडावरही वार झाल्याची शक्यता आहे. तोंडापासून कानापर्यंतही एक वार झाल्याचे यामध्ये सांगण्यात आलं असून, त्याची लांबी 13 सेंमी एवढी असून, रुंदी व खोली दीड सेंमीपर्यंत आहे.

मृत्यूचे कारण काय

डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.

अंगावर कुठे होते किती वार

मानेवर उजव्या बाजूला – 4

तोंडापासून गालापर्यंत – 1

उजव्या हातावर – 3

डाव्या हातावर – 3

तोंडावर – 1

नाकावर – 1

गळ्यावर – 3

महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा घटनाक्रम

20 आक्टोबर 2023 च्या संध्याकाळी महादेव मुंडे यांनी 6 वाजता ट्युशनवरुन मुलांना घरी सोडले. त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले. गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात 7.10 मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले. आझाद चौकात मित्राला भेटले. आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वाजता आढळून आली.ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते अशी कुटुंबीयांनी माहिती दिली. याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुकसह आणखी काही कागदपत्रं होती. ही मोटरसायकल सापडली. मात्र महादेव मुंडे कुठे होते हे माहिती नाही. या मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.

21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांची मेहुणे सतीश फड यांना फोन आला. हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला. मात्र तो फोन स्विच ऑफ आला.त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली. मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितले. महादेव मुंडे यांचा गळा चिरलेला होता आणि गळा कापलेला होता. त्याचबरोबर हातावर, गालावर, पाठीवर वार करण्यात आले होते. महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मी कलेक्शनचे साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आम्ही आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

5 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

5 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

5 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

5 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

5 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

5 तास ago